किचनमधील पदार्थ त्यांना पळवून लावतील!
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक भागात सापाचा वावर हा मोठ्याप्रमाणात दिसून येतो. खरं तर सापाला पाहून अनेकांची धादल उडत असते. प्रत्येकजण हा सापाला घाबरत असतो. भारतात अनेक प्रकारच्या सापाच्या प्रजाती या आढळत असतात. काही साप विषारी असतात तर काही साप विषारी नसतात.
मात्र सापाने दंष केल्यामुळे भारतात अनेक जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात साप घरात येण्याच प्रमाण अधिक असतं. कारण पावसाचं पाणी सापांच्या बिळात गेल्यान ते बिळांच्या बाहेर येतात आणि आश्रय शोधण्यासाठी ते घरात शिरतात.
साप घरात शिरु नये म्हणून ‘हे’ सोपे उपाय नक्की ट्राय करा.
- तुमच्या दाराला किंवा खिडकीला कांदा आणि लसणाचे रोप लावू शकतात. किंवा घराच्या बाहेर आंगणात कांदा,लसणाचे रोप लावावेत. कारण कांदा लसणाच्या उग्र वासाने साप जवळ येत नाही. सापाला कांद्याचा, लसणाचा तीव्र वास सहण होत नाही.
- दालचिनी पावडर,पांढरा विनेगर आणि लिंबाचा रस एकत्री करुन त्याची फवारणी घराच्या अडगळीच्या जागी करा तसेच घराच्या बाहेर, खिडकीवर करा त्यामुळे साप घरात येणार नाही.
- काही सापांना वनस्पतींचा वास सहन होत नाही. तर काही साप हे त्या वनस्पतींपासून दूरच रहातात. त्यात अशी एक वनस्पती आहे सर्पगंधा. सर्पगंधा वनस्पतींपासून काही साप लांबच रहातात. सर्पगंधा वनस्पतीचा तीव्र वास सापांना सहन होतं नाही, म्हणून साप या वनस्पतींपासून दोन होत लांब रहातात. तुम्ही जर ही वनस्पती तुमच्या अंगणात, खीडकीच्या शेजारी, मधल्या खोलीत लावल्यास साप येण्याचा प्रश्नचं येणार नाही.
- सर्पगंधा वनस्पती सापडली नाही तर निवडुंग, स्नेक प्लांट, तुळशीचे झाड,लेमन ग्रास या वनस्पतींची लागवड करू शकता.. या वनस्पतींपासून सुद्धा साप हे दूर रहातात.
