राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांचे प्रतिपादन
सातारा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सातारा जिल्ह्यातील तळागाळातील लोकांबरोबरच खेडोपाडी पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (Satara District NCP) कार्याध्यक्ष अमितदादा कदम (Amitdada Kadam) यांनी केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमितदादा कदम म्हणाले, राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी एका खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना (Chief Minister Ladki Bahin Yojana) असं या योजनेचे नाव आहे. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना शासनाकडून ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. ज्या कुटुंबांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना आधी या योजनेचा लाभ मिळणार नव्हता. पण नंतर ही अट काढून टाकण्यात आली आहे. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यातील महिला या योजनेचा फायदा करुन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, सातारा जिल्ह्याचा विचार करता सरकारने माता भगिनींसाठी आणलेल्या या योजनेचे सर्वच मुली-महिलांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. यानंतर योजना आपल्या दारी या माध्यमातून घरी बसून महिलांना या योजनेची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे ही योजना सर्वसामान्य महिला-मुलींपर्यंत पोहोचावी यासाठी सातारा राष्ट्रवादी कॉंग्रेस तळागाळापर्यंत जात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत आहे. यापासून महिलांना काम मिळावे, तसेच जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी लवकरच एक शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्षा स्मिता देशमुख, वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर, सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्षा सीमा जाधव, निवास शिंदे, सोमनाथ कदम, महेश कदम, सुवर्णा राजे, संगीता देशमुख, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
