Explore

Search

April 19, 2025 4:57 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : सातारा कारागृहात बंदीजनांसाठी संगीत कार्यक्रम

सातारा : भारतीय सेवक संगती सातारा संस्थेच्यावतीने कारागृहातील बंद्यांसाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समुपदेशन व सकारात्मक विचारांकडे पाऊल टाकून गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर होण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंदयांच्या मनोरंजनास देखील प्राधान्य देण्यात आले.

या कार्यक्रमातून बंदींना दैनंदिन जीवन जगत असताना जीवनातले चांगले व वाईट अनुभव गायक व लेखक अजय चव्हाण यांनी सांगितले. भारतीय सेवक संगतीचे अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी कारागृहातील बंदींना गुन्हेगारी वृत्तीपासून दूर जाऊन समाजात आपले चांगले स्थान निर्माण करण्याबाबत संदेश दिला.

या कार्यक्रमास भारतीय सेवक संगतीचे अध्यक्ष कृष्णात पाटील, सुधाकर कांबळे, संजय गायकवाड, सतीश कमलाकर, देविदास पिल्ले, सचिन लोखंडे, विकास चंद्रनारायण, सचिन पोळ, अजय चव्हाण, ॲनी भोरे, नमिता भोरे, राजेश अलवा तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार अहमद संदे, सतीश अब्दागिरे, प्रेमनाथ वाडेकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy