मुंबई : रिलायन्स समूहाचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे लग्न नुकतेच पार पडले. अनंतने राधिका मर्चंटसोबत १२ जुलैला लग्नगाठ बांधली. या जोडप्याचे लग्न अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडले. या लग्नाची देशभरातच नव्हे तर जगभरात चर्चा सुरू आहे.
लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याचे १४ जुलैला (रविवार) वेडिंग रिसेप्शन पार पडले. या स्वागत समारंभाला मंगल उत्सव असे नाव देण्यात आले होते. या सोहळ्याला पुन्हा एकदा सेलेब्सची मांदियाळी पहायला मिळाली. या रिसेप्शनमधून नुकतीच अनंत-राधिकाची झलक पहायला मिळाली आहे. ज्यामध्ये राधिकाचा रॉयल अंदाज पुन्हा चर्चेत आला आहे. राधिकाचा ग्रॅंड रिसेप्शनचा लूक कसा होता? चला तर मग जाणून घेऊयात.
राधिकाचा रिसेप्शन लूक
या ग्रॅंड रिसेप्शनला राधिका मर्चंटने पुन्हा एकदा रॉयल अंदाजात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राधिकाने सोनेरी रंगाचा लॅव्हिश गाऊन परिधान केला होता. यासोबत तिने हेव्ही दुपट्टा कॅरी केला होता. तिचा हा सुंदर गाऊन डोल्से गब्बाना (Dolce Gabbana) आणि प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाईन केला होता. या गाऊनवर राधिकाने कॉर्सेट स्टाईल ब्लाऊज परिधान केला होता. तिचा हा लूक रिया कपूरने स्टाईल केला होता.
राधिका या गाऊनमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. तिच्या या शिमरी गाऊनवर सोन्याचे जरदोसी वर्क होते. त्यासोबतच तिने गाऊनवर डॉल्से गब्बानाचा अल्टा मोडा सरदेग्ना २०२४ चा कॉर्सेट ब्लाऊज परिधान केला होता. ज्यावर एम्बॉयडरीचे बारीक वर्क करण्यात आले होते. या शाही पोशाखात रधिका खूपच सुंदर दिसत होती.
राधिकाचा मेकअप अन् हेअरस्टाईल
राधिकाने या अप्रतिम गाऊनवर केस मोकळे सोडले होते. तसेच, या गाऊनवर तिने मिनिमल मेकअप केला होता. या गाऊनवर तिने गळ्यात हिऱ्यांचे दागिने, कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या. यादरम्यान तिच्या केसांमध्ये सिंधूर ही दिसून आले. ज्यामुळे, तिचा न्यू ब्राईड लूक आणखी खुलून दिसत होता. एकूणच तिचा हा एलिगंट लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे.
