Explore

Search

April 19, 2025 5:00 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Pune Crime : पुण्यात १६ वर्षीय मुलीने नशेत संपविले जीवन

मैत्रीण आढळली बेशुद्धावस्थेत

पुणे : मैत्रीणीसोबत घरात मद्य पार्टी केल्यानंतर १६ वर्षीय मुलीने स्वतःचे जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यात घडला आहे. हे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या मुलीसोबत असलेली मैत्रीण बेशुद्धावस्थेत सापडली आहे. तिच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलीने स्वतःचा जीव का घेतला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. तनिषा शांताराम मनोरे (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे. मद्य पार्टीत आणखी एक १६ वर्षीय मुलगी अतिमद्यसेवनामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिषा येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहे. ती एका महाविद्यालयात अकरावीत होती. तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी (ता. १५) सायंकाळी दोन मैत्रिणींनी तनीषाच्या घरी मद्य पार्टी केली. तनिषाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाला तनिषाच्या मैत्रिणीने दूरध्वनी करून रात्री आठच्या सुमारास बोलावून घेतले. त्यानंतर मुलगा घरी आला. त्याने घरात डोकावून पाहिले. तेव्हा तनिषाने गळफास घेतला असल्याचे उघडकीस आले. त्याने तनिषाला खाली उतरवले. चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याने तनिषाच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तनिषाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता.

तनिषाची मैत्रीण देखील बेशुद्धावस्थेत सापडली. तिला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा ती मद्याच्या नशेत असल्याचे लक्षात आले. तिच्या आई-वडिलांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता तनिषा आणि मैत्रिणींनी मद्य पार्टी केल्याचे उघडकीस आले.

दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तनिषाची मैत्रीण बेशुद्ध झाल्याने तनीषाने आत्महत्या का केली, तसेच तिने कधी गळफास घेतला, याबाबतची माहिती समजू शकली नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy