मुख्यमंत्र्यांच्या सूचनेची तत्काळ अंमलबजावणी ; ४०० स्वच्छता दूत सज्ज
अकोला : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठूरायाच्या पंढरीत स्वच्छता राखण्यासाठी व लक्षावधी भाविकांना कोणत्याही रोगराईला सामोरे जावे लागू नये, यासाठी भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) ४०० स्वच्छतादूत सज्ज झाले असून, रविवारपासून पंढरीत स्वच्छता राखण्याचे काम करण्यात येत आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक, वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. या वेळी पंढरीत स्वच्छता राखली जावी, भाविकांना कोणत्याही अस्वच्छतेचा सामना करावा लागू नये, यासाठी ‘बीव्हीजी’ने पुढाकार घ्यावा, अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी ‘बीव्हीजी’चे चेअरमन मा. हणमंतराव गायकवाड यांना केली होती. गायकवाड यांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत जवळपास ४०० स्वच्छतादूत अत्याधुनिक साहित्यासह पंढरपूरला रवाना केले आहेत. या स्वच्छतादूतांमार्फत ‘बीव्हीजी’ची विठूरायाचरणी स्वच्छतासेवा अर्पण करण्यात येत आहे. गतसाली देखिल बीव्हीजीच्या वतीने पांडूरंगाच्या चरणी स्वच्छता सेवा अर्पण करण्यात आली होती.
‘वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेली पंढरी स्वच्छ करण्याची संधी आमच्या ‘बीव्हीजी’ला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या सूचनेनुसार आमचे ४०० स्वच्छतादूत अत्याधुनिक साहित्यासह पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांना स्वच्छ व निरोगी वारी अनुभवता यावी, यासाठी हे स्वच्छतादूत अहोरात्र कार्यरत आहेत. सदर सेवेचा कोणताही मोबदला न घेता ‘बीव्हीजी’तर्फे ही सेवा देण्यात येत आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘बीव्हीजी’चे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली.
तर, ‘स्वच्छता क्षेत्रात काम करणारी ‘बीव्हीजी’ ही देशातील प्रथम क्रमांकाची संस्था आहे. पंढरपूर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘बीव्हीजी’ने पुढाकार घेतल्याने सरकारी यंत्रणेवरचा आणि मनुष्यबळावरील ताण निश्चितच कमी होणार आहे. टॉयलेट स्वच्छतेसाठी बीव्हीजीच्या वतीने बायोकल्चर नावाची पावडर वापरण्यात येणार आहे. जेणेकरून बायोकल्चरच्या वापराने स्वच्छता गृहात दुर्गंधी पसरणार नाही.
संत गाडगे महाराजांची प्रेरणा
संत गाडगे महाराजांनी सबंध जगाला स्वच्छतेची प्रेरणा दिली होती. त्यांच्या प्रेरणेतुनच स्वच्छतेतुन सामजिक बांधिलकी जपण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पंढरीतल्या स्वच्छता सेवा आम्ही संत गाडगे बाबांच्या चरणी अर्पण करतो.
यावेळी हणमंतराव गायकवाड, चेअरमन तथा व्यवस्थापकिय संचालक बीव्हीजी,संदेश पोतेकर-व्यवस्थापक, बीव्हीजी आदी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी विशाल केदारी, माध्यम समन्वयक बीव्हीजी मो. क्र : 8830 590 413 / 771986 0058 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.
