सातारा : वृध्देला मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाथरुममध्ये कशाला जाताय, या कारणातून तिघांनी वृध्देला मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कमल बबन माने (वय 75, रा. म्हसवे ता.सातारा) यांनी विजय माने, प्रियांका जाधव, रेखा माने यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 13 जुलै रोजी म्हसवे येथे घडली आहे. संशयितांनी कळकाच्या दांडक्याने मारहाण केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
