Explore

Search

April 14, 2025 7:54 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Cricket News : व्हीव्हीएस लक्ष्मणचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपणार

नवी दिल्ली : भारतानं वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावलं. भारतीय क्रिकेटमध्ये या विजेतेपदासह स्थित्यंतराला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी 20  क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळं या तिघांची जागा भरुन काढणारे खेळाडू बीसीसीआयला शोधावे लागणार आहेत. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं टी 20 संघांचा कॅप्टन निवडावा लागणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळ देखील टी 20 वर्ल्ड कपनंतर संपला. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची कारकीर्द श्रीलंका दौऱ्यापासून होणार आहे. हे सर्व घडत असताना व्हीव्हीएस लक्ष्मणनं मोठा निर्णय घेऊ शकतो आहे. लक्ष्मणनं नॅशनल क्रिकेट अकादमीचं पद सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो.

व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा निर्णय

राहुल द्रविडनं मुख्य प्रशिक्षक पद सोडल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण यानं बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचं प्रमुख पद सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो. व्हीव्हीएस लक्ष्मणचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. लक्ष्मणनं कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा नव्यानं करार नसल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे. त्यामुळं राहुल द्रविड पाठोपाठ व्हीव्हीएस लक्ष्मण देखील बीसीसीआयच्या एका जबाबदारीतून मुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. लक्ष्मणनं नॅशनल क्रिकेट अकादमीचं प्रमुख पुढील काळात काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. यासाठी त्यानं वैयक्तिक कारण असल्याचं म्हटलं आहे.

एनसीएचं प्रमुखपद कुणाकडे जाणार?

व्हीव्हीएस लक्ष्मणनं नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदावर काम करण्याबाबतच्या कराराचं नुतनीकरण करणार नसल्याचं कळवलंय. त्यामुळं राहुल द्रविडसोबत भारतीय संघाचं फलंदाजी प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या विक्रम राठोड यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. विक्रम राठोड यांचं नाव नॅशनल क्रिकेट अकादमीते प्रमुख म्हणून चर्चेत आहे.

लक्ष्मणच्या मार्गदर्शनात मालिका विजय

भारतीय क्रिकेट संघाची यंग ब्रिगेड नुकतीच झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर होती. झिम्बॉब्वे दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे देण्यात आलं होतं. या यंग ब्रिगेडच प्रशिक्षक म्हणून जबाबदारी व्हीव्हीवएस लक्ष्मणवर देण्यात आली होती. भारतानं झिम्बॉब्वेविरुद्धची मालिका 4-1 अशी जिंकली. पहिल्या टी 20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं पलटवार करत मालिका 4-1 अशी जिंकली. आता भारतीय संघ तीन टी 20 मॅच आणि तीन वनडे मॅचसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy