Explore

Search

April 18, 2025 6:15 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Monsoon Health : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी घ्या आयुर्वेदिक काढा

सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून, मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पावसाळ्यात थंडी आणि पावसामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. खास करून लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती या संसर्गजन्य आजारांना बळी पडतात.

अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला निरोगी आणि तंदूरूस्त ठेवण्यासाठी आपण आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही आहारात योग्य बदल करून तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. यासाठी तुम्ही आयुर्वेदिक काढ्यांची मदत घेऊ शकता.

या काढ्यांच्या मदतीने तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता आणि ताप-सर्दीसारख्या संसर्गजन्य आजारांना दूर ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात काही इम्युनिटी बूस्टर आयुर्वेदिक काढ्यांबद्दल.

आलं अन् तुळशीचा काढा

तुळस ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. धार्मिक महत्व असण्यासोबतच तुळस तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ही ओळखली जाते. तुळशीसोबतच आलं देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कारण, आल्यामध्ये अनेक पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो.

आलं-तुळशीचा काढा बनवण्यासाठी सर्वात आधी तुळशीची पाने आणि किसलेलं आलं पाण्यात ५-७ मिनिटे उकळवा. त्यानंतर, हे मिश्रण गाळून त्यावर मध आणि लिंबाचा रस घालून हा काढा प्या. हा काढा प्यायल्याने विविध संसर्गांपासून आपला बचाव होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

दालचिनी-लवंगचा काढा

दालचिनी-लवंगचा वापर खास करून गरम मसाला म्हणून खाद्यपदार्थ तयार करताना केला जातो. परंतु, जेवणाला चव देण्यासोबतच या दालचिनी-लवंगमध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे, लवंग-दालचिनीचा काढा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हा काढा बनवण्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यात एक दालचिनी आणि चार-पाच लवंग घ्या.

हे दोन्ही घटक १० मिनिटे पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर, हे मिश्रण पाण्यात गाळून घ्या. आता यामध्ये १ चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून हा काढा प्या. हा काढा प्यायल्याने ताप-सर्दी, खोकला दूर होण्यास मदत होते. शिवाय, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy