अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल या कपलने चाहत्यांसोबत ही गूड न्यूज शेअर केली आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाने 16 जुलै रोजी बाळाला जन्म दिला. यामुळे आता अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल आई-बाबा झाले आहेत, त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून त्यांनी हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अभिनेत्री रिचा चढ्ढा-अली फजल बनले आई-बाबा
अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल आता बॉलिवूडमधील सर्वात नवीन सेलिब्रिटी पॅरेटंस बनले आहेत. नुकतंच, या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनापूर्वी मॅटर्निटी फोटोशूट करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. आता त्यांनी बाळाच्या आगमनाची गोड बातमी शेअर केली आहे. रिचा आणि अली या जोडप्याला मंगळवारी मुलगी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रिचा चढ्ढाने प्रसूतीची वाट पाहत असताना तिच्या बाळाला ‘आजा यार’ म्हणत सोशल मिडिया पोस्टही शेअर केली होती.
चाहत्यांसोबत शेअर केली गूड न्यूज
अभिनेता रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल यांना मुलगी झाली आहे. या कपलने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही गोड घोषणा केली आहे. मीडियाला दिलेल्या निवेदनात जोडप्यानं लिहिलं आहे की, “16 जुलै 2024 रोजी आमच्या घरी एका निरोगी गोंडस मुलीचा जन्म झाल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमची कुटुंबे खूप आनंदी आहेत आणि आमच्या सर्व शुभचिंतकांचं प्रेम आणि आशीर्वादासाठी आभारी आहोत. आमच्यावर असं प्रेम करत राहा.”
अभिनेत्री रिचा चढ्ढानं दिला गोंडस मुलीला जन्म
अभिनेता रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल यांची लव्ह स्टोरी चित्रपटापासून सुरु झाली. फुकरे चित्रपटाच काम करताना त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं. 2013 मध्ये या जोडप्याने डेटिंगला सुरुवात केली. त्यानंतर रिचा आणि अलीने 2020 मध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्नगाठ बांधली. त्यांनी 2022 मध्ये त्यांनी कुटुंबिय आणि मित्रपरिवारासमोर लग्न केलं. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्यानं ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. आता या जोडप्याच्या घरी तान्हुल्याचं आगमन झालं आहे.
