Explore

Search

April 15, 2025 9:11 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : गजापुरात दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या दोषींना शोधून काढून कारवाई करणार :  शंभूराज देसाई

कराड : विशाळगडाच्या परिसरात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. अतिक्रमण विशाळगडावर होते आणि दगडफेक, जाळपोळ, मोडतोड तेथून चार किलोमीटर अलीकडे झाली. त्यामुळे अधिक सतर्कता घेतली असती, तर कदाचित हा अनर्थ टाळता आला असता. तेथील पालकमंत्र्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तेथील सर्व प्रकरणाची माहिती घेऊन दोषींना शोधून काढून कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे दिला.
दरम्यान मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील हे काय बोलले आहेत ते मी ऐकलेले नाही. मात्र, आवश्यकता असल्यास मी त्यांची भेट घेईन, असेही ते म्हणाले. पालकमंत्री देसाई यांनी येथील कोयना बॅंकेस भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अॅड. उदयसिंह पाटील, बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, रयत कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्रायकिंग रेट ४७ आहे. आम्ही मायक्रोप्लॅनिंग केल्याने लोकसभेला चांगले यश मिळाले आहे. आम्ही विधानसभेच्या कामाला लागलो आहोत. जागा किती लढवायच्या हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मित्र पक्षाचे नेते ठरवतील. लवकरच त्यासंदर्भात बैठक होणार आहे.
Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy