मुंबई : बॉलिवूडचे महानायक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन कायम सक्रिय असतात. अमिताभ बच्चन कायम त्यांच्या आयुष्यातील चांगली – वाईट गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. शिवाय अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नुकताच, अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नात बच्चन कुटुंब एकत्र पोहोचलं, तर आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या राय वेगळ्या आल्या… त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिक उधाण आलं.
दरम्यान, अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधी एक पोस्ट लाईक केली होती. ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घस्फोटाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी अशी पोस्ट केली आहे. ज्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.
ट्विटरवर स्वतःचा एक फोटो पोस्ट करत अभिषेक बच्चन म्हणाले, ‘पुन्हा कामासाठी जाणं कठीण… कठीण… पण आयुष्य कधीच सोपं नसतं…’, अमिताभ बच्चन यांनी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सोशल मीडियावर अभिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
अमिताभ बच्चन कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांपर्यंत पोहोवत असतात. अनेक वर्ष सिनेमांच्या माध्यामातून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे बिग बी साता समुद्रापार देखील प्रचंड प्रसिद्ध आहेत. आजही चाहते अभिताभ बच्चन यांचे सिनेमे पाहाण्यासाठी उत्सुक असतात.
अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांचं नातं
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. 2007 मध्ये अभिषेक – ऐश्वर्या यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या बच्चन हिला जन्म दिला. आराध्या हिच्यासोबत कायम ऐश्वर्या हिला स्पॉट केलं जातं. पण गेल्या काही दिवसांपासून अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना जोर धरला आहे.
