नजर होईल तेज, रक्तशुद्धीसाठी आवश्यक
जसजसं वय वाढू लागतं तसं डोळ्यांच्या समस्या सुरू होतात. फक्त मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनाही नंबरचे चष्मा लागतात. यावर उपाय म्हणून खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करायला हवी. डोळे चांगले राहण्यासाठी योग्य खाणंपिण्याच्या सवयी असणं महत्वाचे असते.
डोळे चांगले राहण्यासाठी ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये असायला हवी याशिवाय व्हिटामीन ए मिळायला हवं. कारल्याचा योग्य वापर केल्यास १५ दिवसांत परिणाम दिसायला सुरूवात होते.
कारल्यात व्हिटामीन ए, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय डोळ्यांसाठी आवश्यका असणारे कॅरोटीन, बीटाकॅरोटीन, ल्युटीन, मॅग्नेशियम, मॅन्गनीज, पोटॅशियम, आयर्न आणि जिंक यात भरपूर प्रमाणात असते.
कारल्यास एंटी डायबिटीक गुण असतात. ज्यामुळे डायबिटीसशी लढण्यास मदत होते. सुकवून वाटून वाटून याची पावडर बनवा ही पावडर रिकाम्या पोटी १ चमचा या प्रमाणात पाण्यासोबत घ्या.
आयुर्वेदात याचे वर्णन रक्त शुद्ध करणारे म्हणून केले आहे. हे रक्तातील घाण आणि हानिकारक गोष्टी काढून टाकण्याचे काम करते. त्यामुळे त्वचा चमकू लागते.
विषारी पदार्थांव्यतिरिक्त, कारले बॅड फॅट चरबी देखील काढून टाकू शकतात. त्याचा वापर करून वजन कमी करता येते. यासाठी कडूलिंबाच्या रसात लिंबाचा रस मिसळून सकाळी सेवन करा. हे पचन वाढवून चरबी बर्न करते.
दोन कारल्यांचा रस प्यायल्याने किडनी स्टोनचा धोकाही कमी होतो. 20 ग्रॅम कारल्याचा रस घेऊन त्यात मध मिसळून प्या. तुम्हाला कोणत्याही तब्येतीच्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा रस प्या. तुम्ही आहारात आठवड्यातून १ ते २ वेळा कारल्याचा समावेश करू शकता.
