Explore

Search

April 18, 2025 6:30 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Maratha Reservation : गोर-गरीब समाजाचा विचार करा व आरक्षण द्या : जरांगे-पाटील

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणासाठी भाजपाला सत्तेवर आणा या अमित शहरांच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आरक्षण देण्यासाठी तुम्हाला कोणी रोखले, सध्या सत्ता कोणाची आहे? आरक्षण देतो देतो म्हणून किती दिवस वाट पाहायची? गोर-गरीब समाजाचा विचार करा व आरक्षण द्या. असे मनोज जरांगे यांनी सोमवार ता.22 रोजी अंतरवाली सराटी येथे सांगीतले.

जरांगे हे पाचव्यांदा उपोषण करत असुन सोमवारी उपोषणाचा त्यांचा तिसरा दिवस आहे. या वेळी बोलतांना त्यांनी सांगितलं कि, अमित शहा यांना गरीबाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, त्यांना मराठा, गुर्जर, आदी मोठ्या जाती संपवायच्या आहेत.

सत्ता असुन आरक्षण मिळत नाही उलट आंदोलन दरम्यान लाठी हल्ला झाला, गोळीबार झाला, खोटे गुन्हे दाखल झाले. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले याची काय भूमिका आहे, त्यांचा पाठींबा आहे का या पेक्षा तुम्हाला द्यायचे का नाही ते सांगा तुम्हाला फक्त मराठा समाजाचे मत पाहिजे भुजबळ शंभर टक्के दंगल घडवणार आहे शासनाने त्यांना समज द्यावी.

असा प्रश्न जरांगे यांनी शासनाला केला आहे.मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार यांची भेट होणार आहे या बाबत विचारले असता दोघांना आरक्षणाचे काही घेण देण नाही त्यांचा काय निर्णय होते ते लवकरच कळेल. आमदरकीचा राजीनामा देतो या आ. प्रसाद लाड यांच्या वक्तव्य बाबत जरांगे यांनी सांगितले कि, लाड यांनी समाजाचा रोष घेऊ नये,  मॅनेज करण्याचा प्रयत्न करू नये समाजाच्या बाजुने उभे राहीले पाहिजे असे सांगीतले.

तर येवल्यात उपोषण करणार

अंतरवाली सराटी येथे उपोषण चालू आहे, या भागात मंत्री छगन भुजबळ हे मुद्दाम ओबीसी चे आंदोलन घडवून आणत आहे, त्यांना असे करायचे असेल तर मी येवला, नाशिक येथे आंदोलन, उपोषण करणार परवानगी करीता अर्ज दिला आहे मग गर्दी कसी आसते तुम्हाला कळेल असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy