नवी दिल्ली : वुमन्स आशिया कप टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा अंतिम टप्पा सुरु आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित रंगतदार वळणावर येऊन ठेपलं आहे. भारत, पाकिस्तान,नेपाळ आणि यूएई हे संघ अ गटात आहेत. या गटात भारतीय संघाने दोन पैकी दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत दावा पक्का केला आहे. भारताचं नेट रनरेट चांगला असल्याने शेवटच्या सामन्यात काही गडबड जरी झाली तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे दुसऱ्या उपांत्य फेरीच्या संघासाठी जर तरचं गणित आहे. दुसरीकडे, यूएईचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या संघासाठी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात चुरस आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात या दोन्ही संघांचा कस लागणार आहे. पाकिस्तान विरुद्ध यूएई आणि भारत विरुद्ध नेपाळ असा सामना आहे. शेवटच्या सामन्यात यूएईने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली तर पुढचं गणित कठीण होईल. दुसरीकडे, पाकिस्तानने यूएईविरुद्धचा सामना जिंकला की प्रश्न काही अंशी सुटेल. पण उपांत्य फेरीसाठी भारत आणि नेपाळ या सामन्याकडे लक्ष ठेवावं लागेल. चुकून नेपाळने भारताला पराभूत केलं तर मात्र पाकिस्तानचं काही खरं नाही. त्यामुळे जर तरच्या गणित पाकिस्तानचं पुढचं गणित बिघडू शकतं.
भारताने दोन पैकी दोन सामने जिंकत 4 गुण आणि +3.386 नेट रनरेटसह पहिलं स्थान पटकावलं आहे. तर पाकिस्तानने एक सामना गमवून आणि एक जिंकून 2 गुण आणि +0.409 नेट रनरेटसह दुसरं स्थान पटकावलं आहे. नेपाळने दोन पैकी एक सामना जिंकून आणि एक गमवल्याने 2 गुण आणि -0.819 नेट रनरेटसह तिसरं स्थान पटकावलं आहे. तर यूएईने दोन पैकी दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे शून्य गुणांसह -2.870 नेट रनरेट आहे.
चारही संघांचे खेळाडू
भारतीय महिला संघ: शफाली वर्मा, स्मृती मंधना, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग, उमा चेत्री, एस सजना, अरुंधती रेड्डी, आशा शोभना
संयुक्त अरब अमिराती महिला संघ: ईशा रोहित ओझा (कर्णधार), तीर्था सतीश (विकेटकीपर), रिनिता राजित, समायरा धरणीधारका, कविशा इगोडागे, खुशी शर्मा, हीना होचंदानी, वैष्णवे महेश, रितीका राजित, लावण्य केनी, इंधुजा नंदकुमार, मेहमी ठाकूर, ईमिली थॉमस, ऋषिथा राजित, सुरक्षा कोट्टे
पाकिस्तान महिला संघ: गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, आलिया रियाझ, निदा दार (कर्णधार), तुबा हसन, इरम जावेद, फातिमा सना, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल, डायना बेग, ओमामा सोहेल, नजीहा अल्वी, तस्मिया रुबाब.
नेपाळ महिला संघ : समझ खडका, सीता राणा मगर, कविता कुंवर, इंदू बर्मा (कर्णधार), रुबिना छेत्री, पूजा महतो, बिंदू रावल, काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), कविता जोशी, कृतिका मरासिनी, सबनम राय, डॉली भट्टा, रोमा थापा, ममता चौधरी, राजमती आयरी
