Explore

Search

April 13, 2025 10:36 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांसाठी पत्नी अमृता यांची खास पोस्ट

मुंबई : अमृता फडणवीस यांनी या खास दिवसाचे औचित्य साधून लिहलं, ‘देवेंद्र फडणवीस तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुम्ही समानता आणि न्यायाचे दीपस्तंभ बनून, लोकांच्या जीवनात सुधारणा करावी आणि जगाला आनंदाने उजळून टाकावे, अशा शुभेच्छा’. सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स आल्या आहेत.

अमृता फडणवीस या राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरी त्या कायम पती देवेंद्र फडणवीस यांची खंबीरपणे साथ देताना दिसून येतात. कधी टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधतात. देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांचा विवाह २००५ साली झाला होता. हे दोघं नेहमीच सर्वांना कपल गोल्स देताना दिसतात.

भाजपचा विश्वासू चेहरा असलेल्या फडणवीसांची महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. मजबूत नेतृत्व, प्रशासनावरील पकड असलेले देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काही काळ मॉडेलिंगदेखील केली होती.नागपूरच्या एका दुकानासाठी त्यांनी मॉडेल म्हणून काम केलं होतं. त्यांचे मॉडेलिंगचे फोटो सोशल मीडियात चर्चेत असतात.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy