Explore

Search

April 13, 2025 10:38 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

India vs Sri Lanka Series : भारतविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेने जाहीर केला संघ

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. 27 जुलैपासून दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. श्रीलंकेने फक्त टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. त्याचवेळी बीसीसीआयने टी-20 आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे.

श्रीलंकेने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज चारिथ असलंकाची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. असलंकाने वानिंदू हसरंगाची जागा घेतली आहे. 2024 टी-20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर हसरंगाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजय डी सिल्वाला डच्चू-

अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजय डी सिल्वाला भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्थान मिळालेले नाही. तर दिनेश चंडिमल आणि कुसल परेरा सारखे वरिष्ठ खेळाडू संघात परतले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये या दोघांनी चमकदार कामगिरी केली होती.

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ-

चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलेज, महेश वेलेज, चामिंडू विक्रमसिंघे, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा आणि बिनुरा फर्नांडो.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ-

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक-

27 जुलै – 1ली टी-20 (पल्लेकेले)

28 जुलै – दुसरी टी-20 (पल्लेकेले)

30 जुलै – तिसरी टी-20 (पल्लेकेले)

2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)

4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)

7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका कधी, कुठे आणि कशी बघता येणार?

सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर टीव्हीवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका तुम्ही पाहू शकाल. तर मोबाईलवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना सोनी लाइव्ह ॲपवर ही मालिका पाहता येणार आहे. ही मालिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसारित होणार आहे. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी तुम्हाला सोनी लाईव्हचे सदस्यत्व घ्यावे लागेल.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy