Explore

Search

April 17, 2025 5:37 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : अमिताभ बच्चन यांचा नातू होणार शाहरुखचा जावई!

श्वेताने लेकाच्या निवडीला हिरवा कंदील दिल्याची चर्चा

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना ही अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून रंगत आहेत. खरंतर, त्या दोघांनी कधी या गोष्टीला नकार दिला नाही. पण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्तानं ते एकत्र स्पॉट होतात. आता देखील तसंच काहीसं झालं आहे. पण, यावेळी त्यांच्यासोबत अभिषेक बच्चन आणि नव्या नवेली नंदादेखील स्पॉट झाले आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन एका मोठ्या काळ्या रंगाच्या कारमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला दिसून येत आहे. तर त्यांच्या शेजारच्या सीटवर त्यांचा पुतण्या अगस्त्य नंदा आहे. तर मागच्या सीटवर नव्या नवेली नंदा आणि सुहाना खान दिसून येत आहेत. सुहानाचा कॅज्युअल लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. यात चौघेही एकत्र आनंदी दिसत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, ‘द आर्चिज’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुहाना आणि अगस्त्य यांच्यात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एका सुत्रानुसार, त्या दोघांच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याविषयी माहिती आहे.  अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चनचा मुलगा आहे.  श्वेता बच्चननं त्यांच्या नात्याला कबूली दिल्याची चर्चा आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान आणि सुहाना खान स्टारर ‘किंग’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत अभिषेक बच्चन दिसणार आहे. ज्याला खुद्द अमिताभ बच्चन यांनी दुजोरा दिला आहे. अभिषेक आणि शाहरुखने यापूर्वीही काम केले आहे. पण दोघेही मुलगी सुहानासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. सध्या किंग सिनेमाचं शूटिंग सुरू आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy