Explore

Search

April 14, 2025 7:49 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Yuvraj Singh IPL 2025 : युवराज सिंगची 6 वर्षांनंतर आयपीएलमध्ये होणार एन्ट्री

मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका बजावणार?

नवी दिल्ली :  आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी फ्रेंचायझी सोडू शकतात. आता गुजरात टायटन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी युवराज सिंहचा पर्याय म्हणून विचार केला जात असल्याचे एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गुजरात संघाचे गॅरी कर्स्टन यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक बदल होण्याची शक्यता आहे.

Sports18 च्या मते, गुजरात टायटन्समध्ये अनेक बदल शक्य आहेत. आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी बहुधा संघ सोडणार असून मुख्य प्रशिक्षकपदासाठी युवराज सिंहच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. गुजरात संघाच्या सध्याच्या कोचिंग स्टाफमध्ये आशिष कपूर, नईम अमीन, नरेंद्र नेगी आणि मिथुन मन्हास यांचाही समावेश आहे, पण रिपोर्टनुसार, हे सर्व लोक नवीन संधी शोधू लागले आहेत. दरम्यान 2019 मध्ये आयपीएलमध्ये युवराज खेळाडू म्हणून शेवटचा सामना खेळला होता.

अदानी समूह गुजरात टायटन्समधील भागभांडवल खरेदी करणार?

देशातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यात आता थेट आयपीएलच्या मैदानातही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष आणि आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. अदानी समूह आयपीएलमधील फ्रँचायझी गुजरात टायटन्समधील भागभांडवल खरेदी करण्याची शक्यता आहे.

गुजरात टायटन्स विकत घेण्याची तयारी

खाजगी इक्विटी फर्म CVC कॅपिटल पार्टनर्स IPL फ्रेंचायझी गुजरात टायटन्समधील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. यासाठी तिची अदानी समूहाशी चर्चा सुरू आहे.  CVC कॅपिटल पार्टनर्स IPL फ्रँचायझी गुजरात टायटन्समधील त्यांचे कंट्रोलिंग स्टेक विकण्यासाठी अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपसोबत बोलणी करत आहेत. याचा अर्थ CVC कॅपिटलला फ्रँचायझीमधील बहुसंख्य हिस्सा विकायचा आहे आणि काही हिस्सा स्वतःकडे ठेवायचा आहे.

2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण- 

गुजरात टायटन्स फ्रँचायझीने 2022 मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश केला. आशिष नेहरा पहिल्या सत्रापासून गुजरातचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि 2022 मध्ये गुजरातला आयपीएल चॅम्पियन बनवण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. हा संघ 2023 मध्ये उपविजेता होता, परंतु आयपीएल 2024 च्या हंगामात गुजरातची कामगिरी खूपच खराब होती कारण संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर होता.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy