Explore

Search

April 15, 2025 9:09 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : मीनाक्षी शेषाद्री चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल

व्हिडिओमध्ये जीममध्ये व्यायाम करताना ६० वर्षीय मीनाक्षी दिसत आहे

मुंबई : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मीनाक्षी शेषाद्री चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ६० वर्षीय मीनाक्षी जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. तिचे समर्पण पाहून ती तिच्या फिटनेसबाबत किती जागरूक आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

आपल्या डान्स व्हिडिओंमुळे चर्चेत राहणारी शेषाद्री यावेळी तिच्या जिमच्या व्हिडिओंमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओद्वारे मीनाक्षीने जिममध्ये घाम गाळण्याचे कारण सांगितले. हे कारण नवीन फिल्म प्रोजेक्ट नसून तिचा कूक आहे. होय, मीनाक्षी जीममध्ये खूप मेहनत घेत आहे कारण तिच्या घरात स्वयंपाक करणाऱ्या स्वयंपाकीमुळे.

मीनाक्षीने तिच्या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जेव्हा मी यूएसहून परत आले आहे, तेव्हा माझी लाडकी कुक प्रमिला उत्तम पदार्थ बनवत आहे आणि मला खायला घालत आहे. मी देखील डाएट बाजूला ठेवला आणि प्रत्येक पदार्थांचा खूप आनंद घेतला. मात्र, त्याचा परिणाम असा झाला की माझे वजन काही किलो वाढले आहे. आज, बॉडी शेमिंगच्या या युगात जेव्हा लोक त्यांच्या शारीरिक दिसण्यावरून ट्रोल करतात, तेव्हा मी माझ्या वर्कआउट रूटीनची एक झलक दाखवत आहे.

ती पुढे सांगते की, माझ्यासाठी व्यायाम म्हणजे योग्य वजन आणि योग्य आकारात राहणे. याशिवाय मला साइज २ मध्ये काहीही रस नाही. मी माझ्या प्रशिक्षकाची खूप आभारी आहे की त्यांनी मला प्रेरित केले. मी कधीही व्यायामशाळेत किंवा प्रशिक्षकासोबत प्रशिक्षण घेतले नाही. मी स्वत: व्यायाम केला आणि स्वतः नृत्य केले. शास्त्रीय नृत्य सादर करण्याचे माझे अजूनही स्वप्न आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy