Explore

Search

April 15, 2025 5:08 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Leopard : पाटण तालुक्यात रोज घडत आहे बिबट्याचं दर्शन

परिसरात भितीचे वातावरण

पाटण : डोंगरी तालुका, मग भूकंपग्रस्त तालुका, धरणांचा तालुका, पवनचक्क्यांचा तालुका, निसर्ग सौन्दर्याने नटलेला तालुका अशा एक ना अनेक कारणांनी पाटण तालुका प्रसिद्ध आहे. यात आता बिबट्याची भर पडली आहे.

बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात आढळून येत आहे. तालुक्याच्या सातही खोऱ्यात बिबट्याची डरकाळी घुमत आहे. यामुळे शेतकरी भयभीत असून यापासून सुटका कधी होणार असा सवाल विचारला जात आहे.

सध्या पाटण तालुक्यात बिबटयाच्या हल्ल्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोज कुठे ना कुठे हल्ला होतच आहे. रात्री अपरात्री तर अनेकदा दिवसा ढवळ्या बिबट्याने हल्ला केल्याचे घटना सातत्याने घडत आहेत.

यात पशुधन बळी पडत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तालुक्यातील धरणामुळे नद्याना पाणी आहे. परिणामी बागायती शेतीमध्ये प्रचंड वाढ झाली. विशेषतः ऊस पीक मोठया प्रमाणावर घेतले जातेय.

याच उसाच्या क्षेत्राला बिबटयाने आपले आश्रयस्थान बनविले आहे. बिबट्याची संख्या देखील वाढली आहे.

त्यामुळे शेत शिवारात एकटे दुकटे फिरायला माणूस धजावत नाही. त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये बिबटयाच्या कारणास्तव भीती वाढली आहे.

काल सायंकाळी निवडे पुनर्वसन नजीक बिबट्याचे अत्यंत जवळून दर्शन झाले. चार चाकी असल्याने संबंधितांनी त्या ठिकाणचा व्हिडीओ देखील काढला.

जवळपास अर्ध्या मिनिटाचा व्हिडीओ मध्ये स्पष्ट असा बिबट्या दिसत असून काही काळ तो उसात रेंगाळला देखील होता. प्रथमच इतक्या जवळून बिबटया प्रत्यक्ष दर्शीनी पहिला तर व्हिडीओच्या माध्यमातून हजारो लोकांनी पहिला. काही तासात हा व्हिडीओ विभागात प्रचंड व्हायरल झाला आहे.

तारळे भागात बिबट्यामुळे पशुधनाची प्रचंड हानी झाली आहे. आठवडयात एखादी घटना घडतेच आहे. त्यामुळे पाटण तालुका बिबटयाच्या उपद्रवाने त्रस्त असून या ताजा व्हिडीओने भीतीत भर पडली आहे. जनतेला या नव्या संकटाचा सामना रोज करावा लागत आहे. यातून सुटका करण्याची मागणी होत आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy