Explore

Search

April 15, 2025 5:18 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Marathi Industry : सिनिअर सोनालीने सांगितला सारख्या नावांचा त्रास

नेटकऱ्यांनी घेतली ज्युनिअर सोनालीची बाजू सल्ला देत म्हणाले…

मराठी इंडस्ट्रीमध्ये सोनाली नावाच्या चार अभिनेत्री आहेत. मात्र त्यातील दोन सोनाली यांची आडनावं देखील सारखी असल्याने चाहते या दोघींमध्ये गोंधळताना दिसतात. त्यामुळे त्यांना सिनिअर सोनाली कुलकर्णी आणि जुनिअर सोनाली कुलकर्णी असंही म्हटलं जातं. असं असलं तरी त्यांच्या नावाचा गोंधळ काही कमी होताना दिसत नाही. याच मुद्द्यावर सिनिअर सोनाली कुलकर्णी हिने एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली. सारख्या नावांमुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतोय असं तिने म्हटलं. मात्र आता यावर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोनालीने नुकतीच अमृता राव यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ती म्हणाली, ‘इतकी वर्ष काम करूनही मला सांगावं लागतं की मी कोणती सोनाली आहे. अनेक कार्यक्रमांचे मला चुकीचे फोन येतात. मी दुसऱ्या सोनालीला यासंदर्भात अनेकदा फोन केला. तिने इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी आपल्या नावात काहीतरी बदल करायला हवा होता. जसं कियारा अडवाणीने केला होता. गुगल सर्च केल्यानंतर माझ्या नावावर वेगळे फोटो येतात त्यामुळे मी काहीच केलेलं नाही असं वाटतं. हे सगळं टाळता आलं असतं.’ यावर आता नेटकऱ्यांनीच सोनालीला सल्ला दिला आहे.

नेटकऱ्यांनी सोनालीची ही अडचण मुळात अडचणच नसल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिलं, ‘मुळात या जगात एका नावाची खूप माणसं असतात. खूप जणांची नावं सारखी असतात. मात्र तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता याला महत्व आहे. तुमच्या माणसांना अशा वेगळ्या ओळखीची गरज नसते.’ एका नेटकऱ्याने विचारलं, ‘ज्युनिअर सोनालीही याबद्दल बोलली आहे. तिलाही असा त्रास सहन करावा लागला आहे. मात्र ती कधीच असं म्हणाली नाही.’ आणखीन एकाने लिहिलं, ‘दोघी सोनाली काम चांगलं करतात आणि त्यांची वेगवेगळी ओळख आहे.. छोटी सोनाली यावर कधी बोलत नाही पण सिनियर नेहमी तक्रार करते हे समजु शकलेले नाही.’

एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘तुमच्या नावापेक्षा तुमचं काम बोलतं. आम्हाला तुमचं काम ठाऊक आहे. तुम्ही उत्तम अभिनेत्री आहात. त्यामुळे नावाचा गोंधळ हा काही एवढ्या चिंतेचा विषय नाही.’ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘एकीकडे आपलं नाव आपली ओळख आहे असं म्हणतात आणि दुसरीकडे दुसऱ्या सोनालीने नाव बदलावं अशी अपेक्षा. तिचं नाव ही तिची ओळख आहे. तिने तरी तिचं नाव का बदलावं. सगळ्यात शेवटी प्रेक्षक महत्वाचा आणि आम्हाला तुम्ही दोघीही तितक्याच प्रिय आहात.’ अशा काही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy