अध्यक्षपदी राहुल देशपांडे, उपाध्यक्षपदी सुधीर देशपांडे यांची सर्वानुमते निवड
सातारा : बहुप्रतिक्षेत असणारी सातारा येथील प्रिंट मिडीया ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनची (आस) स्थापना झाली. सातारमधील प्रिंट मिडीया मध्ये ॲडव्हर्टायझिंग करणाऱ्या एजन्सींची ही संस्था आहे. अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या आणि अनेक दिवसांच्या पाठपुराव्या नंतर बहुचर्चित असोसिएशनला मूळ स्वरूप प्राप्त झाले.
नुकत्याच झालेल्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजच्या बैठकीमध्ये ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन ऑफ सातारा (आस) च्या अध्यक्षपदी कैवल्य ॲडस्चे राहुल देशपांडे यांची तर गजानन ॲडव्हर्टायझर्स चे सुधीर देशपांडे यांची उपाध्यक्षपदी, मनोज मल्टी मिडीया चे मनोज लिंगडे यांची सेक्रेटरीपदी तर अनुष्का ॲडव्हर्टायझिंग चे प्रशांत मोरबाळे यांची खजिनदारपदी एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये डिझाईन मिडीयाचे महेश साळवी, अंबिका ॲडव्हर्टायझिंग चे चेतन जाधव, ओमसुंदर ॲडव्हर्टायझिंग चे संदीप मोहीते यांचा समावेश आहे.
असोसिएशनच्या पहिल्याच झालेल्या बैठकीमध्ये उपयुक्त निर्णय घेण्यात आले आणि ध्येयधोरणे ठरविण्यात आली. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी व दैनिके यांच्यात समन्वय साधून व्यवसायात वाढ करणे व ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात होणाऱ्या बदलांची माहिती सदस्यांना करून देऊन नवीन तंत्रझान आत्मसात करणे हा या असोसिएशनचा मूळ हेतू आहे. असोसिएशनच्या स्थापनेबद्दल आणि कार्यकारिणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
