चेअरमन अमोल मोहिते : 62 वी वार्षिक सभा उत्साहात
सातारा : सातारा शहरासह (Satara City) जिल्हयाची अर्थवाहिनी असणार्या जनता सहकारी बँकेने (Janata Sahakari Bank) रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank) एफ.एस.डब्ल्यू.एम.चे सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे कार्यक्षेत्र विस्तार करण्यासाठी संचालक मंडळाने सुचवलेल्या पोटनियम दुरूस्तीस वार्षिक सभेने मंजुरी दिल्याने बँकेचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्याबरोबरच संपूर्ण पुणे जिल्हा होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी दिली.
जनता सहकारी बँकेची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवीन कला, वाणिज्य कॉलेज इमारत, कोटेश्वर मैदानासमोर, सातारा येथे बँकेचे चेअरमन अमोल उदयसिंह मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. सभेस बँकेचे संचालक मंडळ सदस्य व सभासद उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी अहवाल सालात दिवगंत झालेले नागरिक, शहीद जवान, बँकेचे सभासद, खातेदार, पदाधिकारी, कर्मचारी व त्यांचे नातेवाईक, यांना संचालक मंडळाने श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर ज्येष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक करुन सभेपुढील सर्व विषयांचे वाचन केले. यावेळी सर्व विषयांना सभासदांकडून एकमताने मंजुरी देण्यात आली. यात प्रामुख्याने बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी बँकेचे कार्यक्षेत्र सातारा जिल्हा, संपूर्ण पुणे जिल्हा करण्याबाबत बँकेच्या पोटनियमात संचालक मंडळाने सुचवलेल्या दुरूस्तीस मंजुरी देण्यांत आली.
यावेळी संचालक मंडळाच्यावतीने सभासदांना माहिती देताना ज्येष्ठ संचालक चव्हाण यांनी, आर्थिक वर्ष 2023 – 24 च्या वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केलेल्या बँकेच्या सापंत्तिक स्थितीनुसार बँकेने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार एफ.एस.डब्ल्यू.एम.चे म्हणजेच आर्थिकदृष्ट्या सक्षम, उत्तम व्यवस्थापनाचे सर्व निकष पूर्ण केल्याची माहिती दिली. या निकषांपैकी नेट एनपीए चे प्रमाण 3 टक्क्यांंच्या आत राखणे, मागील आर्थिक वर्षांमध्ये सलग नफ्यात असणे, सीआरएआरचे प्रमाण 13 टक्क्यांपेक्षा जास्त राखणे, हे महत्वाचे निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे बँकेस बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करणे तसेच मोबाईल बँकिंग सारख्या अत्याधुनिक ग्राहक सेवा सुविधा पुरवणे शक्य होणार आहे. याप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सहकार विभागाकडे आवश्यक तो पत्रव्यवहार करण्यास संचालक मंडळाने
मंजुरी दिली आहे. बँकेने हिरक महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीयकृत, व्यापारी व खासगी बँकांपेक्षा कमी व्याजदराच्या म्हणजेच कॅशक्रेडीट तारणी 9 टक्के व सामान्य कर्ज 9.50 टक्के योजना सुरू केल्या असून आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या योजना अंतर्गत देखील कर्ज वितरीत करत असून त्याचा जास्तीत जास्त सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी बँकेचे सभासद सुजित शेख यांनी बँकेने गत आर्थिक वर्षात उत्तम कामकाज करून जे यश प्राप्त केले आहे, ते सभासदांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जेणेकरून सभासदांना बँकेची प्रगती समजेल, असे सांगून संचालक मंडळ सदस्य, सेवकांनी चांगले कामकाज केले त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच बँकेचे जेष्ठ सभासद वसंतराव माळी, शंकरराव निंबाळकर यांनी देखील बँकेच्या संचालकांनी व सेवकांनी केलेल्या चांगल्या कामकाजाबाबत अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी बँकेचे सभासद तात्यासाहेब गणपत कांबळे यांनी सभासदांनी केलेल्या सूचनांचा विचार संचालक मंडळाने करावा असे सुचित केले. त्यावर जयेंद्र चव्हाण यांनी सभासदांच्या सूचनांचा संचालक मंडळ नेहमीच विचार करत आले आहे. सभासदांनी सूचना मांडण्यासाठी वार्षिक सभेची वाट पाहू नये. आपण इतर वेळी केलेल्या सूचनांचा देखील विचार संचालक मंडळ व चेअरमन निश्चित करतील, अशी ग्वाही दिली. वार्षिक सभेतील उपस्थित सभासदांचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी बँकेच्या वतीने आभार मानले. या सभेस बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख व जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी, व्हाईस चेअरमन विजय बडेकर. जेष्ठ संचालिका डॉ. चेतना माजगांवकर, जेष्ठ संचालक जयवंत भोसले, आनंदराव कणसे, अशोक मोने, माधव सारडा, सौ. सुजाता राजेमहाडिक, चंद्रशेखर घोडके, अविनाश बाचल, वसंत लेवे, रामचंद्र साठे, रविंद्र माने, वजीर नदाफ, नारायण लोहार, बाळासाहेब गोसावी, ड. चंद्रकांत बेबले. अक्षय गवळी, मच्छद्रिं जगदाळे, तज्ञ संचालक सीए सौरभ रायरीकर, सीए राजेंद्र जाधव, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य टॅक्स कन्सल्टंट विनय नागर, सीए पंकज भोसले, ड. श्रुती कदम, सेवक संचालक श्री.अन्वर सय्यद, श्री.अभिजीत साळुंखे, बँकेचे जेष्ठ सभासद ड. सुभाष मुंढेकर उपस्थित होते. तसेच बँकेचे मुख्य कार्यालयातील सर्व विभागप्रमुख तसेच बँकेतील सर्व अधिकारी व सेवक वर्ग यांनी सभेच्या ठिकाणी उपस्थित राहून सभेचे यशस्वीरित्या आयोजन केले.
