Explore

Search

April 15, 2025 5:27 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी  घेतल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून

सफाई कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या : एम. व्यंकटेशन

सातारा : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. बैठकीत उपस्थित झालेल्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात. त्याचबरोबर त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013 च्या अंमलबजावणीबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाली. या बैठकीला आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

व्यंकटेशन म्हणाले,  सफाई कामगारी यांची प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी करावी. बैठकीत उपस्थित केलेल्या तक्रारींबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावे. सफाई कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास आयोगाच्या दूरध्वनी क्रमांकावर तसेच संकेतस्थळावर कराव्यात. सफाई कर्मचाऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत या योजनांचाही लाभ  देण्यात  यावा, असेही निर्देश आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेशन यांनी दिले.

सफाई कामगारांच्या शिक्षणाानुसार त्यांना बढती देण्यात यावी. सफाई कामगार नगरपरिषदांच्या घरांमध्ये राहत आहे ती घरी त्यांच्या नावावर करावीत. तसेच कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कायम करावे अशा मागण्या आमदार दीपक चव्हाण बैठकीत  मांडल्या.

सफाई कर्मचारी 35 वर्षाहून अधिक काळ शासकीय निवासानात राहत आहेत ते निवासस्थान त्यांच्या नावावर करण्याची कार्यवाही नगरपरिषद यांनी करावी. त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांची प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी करावी. या कर्मचाऱ्यांना अन्य कोणत्याही प्रकारचे काम लावू नये. ज्या कर्मचाऱ्यांना घरे नाहीत अशा सफाई कर्मचाऱ्यांना रमाई आवास योजनेतून घरकुल उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी बैठकीत सांगितले.

कर्मचाऱ्यांना कोणी सोयी सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांचे पगार बँक खात्यात जमा करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न व त्यांना वेळोवेळी सुविधा उपलब्ध करून देत असल्याबद्दल नगर प्रशासन अधिकारी बापट यांचा आयोगाच्या अध्यक्षांनी सत्कार केला.  विकी खोकर, संजय सोलंकी, अमित सोलंकी यांनीही आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांना पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले.

 

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy