Explore

Search

April 15, 2025 5:27 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Arjun Khotkar : लाडकी बहिण योजनेवरून शिवसेना नेत्याचा अजब सल्ला

मुंबई : राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला तहसील कार्यलयात गर्दी करत आहेत. यातून महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या शिवाय वर्षा तब्बल 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजनाही जाहीर करण्यात आली आहे. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी महिलांना अजब सल्ला दिला आहे. लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गॅस सिलेंडर योजनेचे लाभ घेण्यासाठी सासू सुनांनी कागदपत्री वेगवेगळं राहण्याचा अजब सल्ला अर्जुन खोतकर यांनी महिलांना दिलाय.

अर्जुन खोतकर यांचा सल्ला काय?

तुम्ही सर्वजणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहात.  एका परिवारासाठी मुख्यमंत्र्यांनी 3 सिलेंडर जाहीर केलेत, मात्र तुम्ही थोडी चालाखी करा. सासू- सूना वेगवेगळ्या रहा फक्त कागदपत्री म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर वाढवून मिळतील, असा सल्ला अर्जुन खोतकर यांनी दिला आहे.

जालन्यामध्ये गायरान हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यां उपस्थित होते. या परिषदेला मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. यावेळी केलेल्या भाषणात अर्जुन खोतकर यांनी उपस्थित महिलांना उद्देशून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून हा सल्ला दिलाय.

लाडकी बहीण योजना काय आहे?

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काही योजनांची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहे. असे लाभार्थी महिलेला दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.

घरगुती गॅसबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. लाभार्थी महिलांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. 56 लाख 16 हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे. बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy