सातारा : जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने समाजामध्ये कावीळ आजाराविषयी जनजागृती व्हावी या साठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅली च्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राहुल देव खाडे,डॉ.सुभाष कदम,डॉ.राहुल जाधव,डॉ.रामचंद्र जाधव,डॉ.चंद्रकांत काटकर,सहाय्यक अधीपरीचारिका श्रीम.प्रतिभा चव्हाण, प्रा.अमोल देसाई इ.मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे यांनी मनोगत व्यक्त केले की कावीळ हा आजार एच.आय.व्ही पेक्षाही घातक असून सर्वांनी काळजी म्हणून कावीळ प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे. ‘ ब ‘ प्रकारच्या कावीळ करिता २४ तासाचे आत पोस्ट एक्सपोजर प्रोफेल्याक्सिस देखील उपलब्ध आहे.
या नंतर सर्व मान्यवरांचे हस्ते रॅली ला हिरवा झेंडा दाखऊन रॅली ला मार्गस्थ केले. सदर रॅली मध्ये नर्सिंग कॉलेज सातारा चे १०० विद्यार्थी सह जिल्हा रुग्णालय सातारा मधील अधिकारी,कर्मचारी , विविध अशासकीय संस्थे चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे कार्यक्रम अधिकारी श्री.हेमंत भोसले यांनी केले आभार जिल्हा कावीळ नियंत्रण कार्यक्रम च्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ रूपाली कदम यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन कावीळ नियंत्रण कार्यक्रम च्या समन्वयक श्रीम. फरजाना पटनकुडे व जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक पुंडलिक पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.सुजाता राजमाने यांनी केले.
