Explore

Search

April 13, 2025 7:27 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Ind vs SL 3rd T20 :  सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघानी मिळून फक्त 5 चेंडू खेळले

कर्णधार सूर्यकुमार यादवने  चौकार मारत भारताला दिमाखात केले विजयी 

अत्यंत रोमांचक झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेला  सुपर ओव्हरमध्ये नमवले. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला वॉशिंग्टन सुंदर विरुद्ध केवळ दोन धावा काढता आल्या. यानंतर पहिल्याच चेंडूवर कर्णधार सूर्यकुमार यादवने  चौकार मारत भारताला दिमाखात विजयी केले.

सुपर ओव्हरमध्ये 5 चेंडूत निकाल :

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने पहिली फलंदाजी केली. श्रीलंकेकडून कुशल परेरा आणि कुशल मेंडिस फलंदाजीसाठी आले. तर भारताकडून फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजी केली. पहिलाच चेंडू वाईड गेला. यावेळी श्रीलंकेचा स्कोअर 1-0, असा झाला. त्यानंतर षटकातील दुसऱ्या चेंडूवर कुशल मेंडिसने 1 धाव घेतली. यावेळी श्रीलंकेचा स्कोअर 2-0 असा झाला. तिसऱ्या चेंडूत वॉशिंग्टन सुंदरने कुशल परेराला झेलबाद केले. यावेळी श्रीलंकेचा स्कोअर 2 धावांवर 1 विकेट असा झाला. कुशल परेरा बाद झाल्यानंतर पाथुन निशांका फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र पुढच्याचम म्हणजे चौथ्या चेंडूत वॉशिंग्टन सुंदरने त्याला झेलबाद केले. त्यामुळे श्रीलंकाचा एकुण स्कोअर 2 धावा एवढाच झाला. भारताला विजयासाठी 6 चेंडूत 3 धावांची आवश्यकता होती. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी आले. तर श्रीलंकेकडून तिक्षाणा गोलंदाजीसाठी समोर आला. यावेळी सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार टोलावत भारताला विजय मिळवून दिला. अशाप्रकार 5 चेंडूत सुपर ओव्हरचा निकाल लागला.

रिंकूने अन् सूर्याच्या प्रत्येकी 4 विकेट्स :

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी डावातील 19वे षटक टाकण्यासाठी आलेल्या रिंकू सिंहने केवळ 3 धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. यामध्ये कुशल परेराची मोठी विकेट होती. त्यानंतर शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 06 धावांची गरज होती. मात्र, आता संघाच्या केवळ 4 विकेट शिल्लक होत्या. येथून डावाचे शेवटचे षटक मोहम्मद सिराज किंवा खलील अहमद यांच्यापैकी एकाला दिले जाईल, अशी अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. डावाच्या शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वतः कर्णधार सूर्यकुमार यादवने घेतली.

सूर्यकुमार यादवचे तीन निर्णय गेमचेंजर ठरले :

खलील अहमदनं 18 व्या ओव्हरमध्ये 12 धावा दिल्यानंतर श्रीलंकेला विजयासाठी 9 धावांची गरज होती. सूर्यकुमार यादवनं यावेळी रिंकू सिंगला गोलंदाजी दिली. त्यानं कुशल परेराला 46 धावांवर बाद केलं. यानंतर श्रीलंकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 6  धावांची गरज होती. त्यावेळी सर्वांना वाटत होतं मोहम्मद सिराजनं गोलंदाजी करावी असं वाटत होतं. मात्र, कॅप्टन सूर्यकुमार यादवनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवनं 5  धावा देत दोन विकेट घेतल्या. यामुळं मॅच सुपर ओव्हरपर्यंत पोहचली. यानंतर सूर्यकुमार यादवनं सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी वॉशिंग्टन सुंदरला दिली. त्यानं केवळ दोन विकेट घेतल्या आणि भारताचा विजय सोपा झाला. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे दोघे फलंदाजीला आले. यानंतर सूर्यानं विजयी चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

 

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy