कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी सीजन ५ हा नवा सीजन सुरु झालाय आणि निक्की तांबोळीने घरात प्रवेश केल्या केल्या राडा घालायला सुरुवात केली आहे. प्रत्येक सदस्याचं वागणं निक्कीला काही ना काही कारणामुळे खटकत असून काहींशी तिचे वादही होत आहेत. बिग बॉसनी घरातील सदस्यांवर पहिलं नॉमिनेशन कार्य सोपवलं आहे आणि पहिल्याच टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये जोरदार भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.
निक्की-आर्याची शाब्दिक फाईट
निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होणार आहे. तसेच आर्याने अरबाजला आणि वैभव चव्हाणला सुद्धा फटकारलं आहे. सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करण्यात आला असून निक्की आणि आर्याचं हे भांडण नेमकं कशावरून झालं असेल असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
आता आर्याची सटकली
या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि आर्या जाधव एकमेकांसोबत मोठमोठ्याने भांडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये आर्याला निक्कीचा चांगलाच राग आलेला दिसून येत आहे. आर्या निक्कीला “तुला घाबरायला पाहिजे”,म्हणत धमकी देताना दिसत आहे. तर निक्की तिला “फट्टू” म्हणते. यावर चिडलेली आर्या ,”मला शांत करायचं नाही” असं म्हणत सगळ्यांवर भडकलेली पाहायला मिळाली. आर्याचा हा राग बघून सगळ्यांनाच धक्का बसलाय तर निक्कीचा घरातील वावर सुद्धा सगळ्यांना खटकत आहे.
रितेश सुनावणार का निक्कीला खडेबोल ?
पहिल्या दिवसापासून निक्कीचं घरातील कोणत्या ना कोणत्या सदस्याशी वाद झाला आहे. वर्षा उसगावकर यांच्याबरोबरील मतभेद गाजत असताना नॉमिनेशन टास्कदरम्यान अंकिताशीही तिचं भांडण झालं आणि त्या दोघींनी एकमेकींना धक्काबुक्की केली. त्यामुळे यंदाच्या वीकेंडच्या कट्ट्यावर रितेश तिला खडेबोल सुनावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट
घरात पार पडलेल्या पहिल्या नॉमिनेशन कार्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे. आता या सहा सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे येत्या रविवारी समजेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.
