आहारात करा या गोष्टींचा समावेश
जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनचे उत्पादन कमी होते, तेव्हा लाल रक्तपेशी तयार होत नाहीत. त्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. म्हणजे सामान्य भाषेत रक्ताची कमतरता. यामुळे त्वचा पिवळी पडते, चेहरा व पाय या सारख्या अवयवांना सूज येते, चक्कर येते. अशक्तपणा जाणवतो, श्वास घेण्यात अडचण येणे, हृदयाचे ठोके अनियमित होतात. अशी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि स्वतःची तपासणी करून घ्यावी. सोबत काही पदार्थांचा आहारात समावेश करु शकता.
शरीरातील अशक्तपणाचे मुख्य कारण म्हणजे शरीरात लोहाची कमतरता. यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे, खाण्याच्या योग्य सवयींचा अभाव. त्यामुळे कोणते पदार्थ खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे उत्पादन वाढण्यास मदत होते हे जाणून घेऊया.
ही फळे खाणे फायदेशीर :
ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी रोजच्या दिनचर्येत सफरचंद आणि डाळिंबाचे सेवन करावे. ही दोन्ही फळे ॲनिमियाच्या समस्येवर खूप फायदेशीर मानली जातात आणि इतर पोषक तत्वांची कमतरता देखील पूर्ण करतात.
मनुका खा :
दररोज मनुका खाणे देखील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. मनुका लोहाचा चांगला स्रोत आहे. मनुके रात्रभर भिजत ठेवा आणि रोज सकाळी सेवन करा. याशिवाय द्राक्षे खाणेही फायदेशीर आहे.
हिरव्या पालेभाज्या
पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या देखील लोहाचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या दिनचर्येत हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे.
दुग्धजन्य पदार्थांचे सेवन :
दूध आणि त्याची उत्पादने जसे की चीज, दही इ. सर्व दुग्धजन्य पदार्थ हे पौष्टिकतेचे उत्तम स्रोत आहेत जे तुमच्या शरीराला केवळ ताकद देत नाहीत तर हिमोग्लोबिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देतात. अशक्तपणाची समस्या असल्यास दुग्धजन्य पदार्थ रोज घ्यावेत.
