सातारा : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती निमित्त साधून सातारा नगर परिषदेमधील लाड व पागे कमिटीच्या शिफारशीनुसार ( श्रीमती वनिता भिसे, विजय तुपे, सचिन आवळे, राजू वायदडे, बागणीकर ) पाच सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने आज दिनांक १/८/२०२४ रोजी नियुक्ती आदेश देण्यात आले.
सदरच्या नेमणुका औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिल्यामुळे दिड वर्षे प्रलंबित असलेने संबंधित वारसावर अन्याय झाला होता. परंतु अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने वकिलामार्फत याचिका दाखल करून सफाई कामगारांचे लाड व पागे कमिटीच्या शिफारशीनुसारचे दि.१२ ऑगस्ट १९७५ ते दि. २४ फेब्रुवारी २०२३ चे सर्व शासनाने शासन परिपत्रक व शासन निर्णय औरंगाबाद खंडपीठास सादर करून पाठपुरावा व प्रयत्न केल्याने औरंगाबाद खंडपीठाने दि. २४/६/२०२४ रोजी स्थगिती उठवल्याने आज नियुक्ती आदेश देण्यात आले आहे. तसेच नियुक्ती आदेश देण्याकरिता मा. श्री. अभिजीत बापट साहेब मुख्याधिकारी व मनोज बिवाल आस्थापना विभागाचे सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याने सर्व संघटनेचे वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक मारूडा साहेब जिल्हाध्यक्ष सुरज सोलंकी स्वराज्य कामगार संघटनेचे पदाधिकारी रविंद्र धडचिरे, मिलिंद पवार, जगन्नाथ धडचिरे, किरण गाडे व पदाधिकारी व सफाई कामगार उपस्थित होते…..अशोक मारूडा, सातारा
