Explore

Search

April 19, 2025 8:07 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Crime : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रियकराने इमारतीवरून ढकलून देऊन प्रेयसीचा केला खून

प्रियकरावर गुन्हा दाखल

कराडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या बिहारमधील तरूणीच्या मृत्युचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. प्रेमप्रकरणातून प्रियकराने इमारतीवरून ढकलून देऊन प्रेयसीचा खून केल्याचं तपासात उघड झालं आहे.

सातारा : कराडमध्ये मंगळवारी रात्री (३० जून) रोजी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरूणीचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. प्रेमप्रकरणातून प्रियकराने इमारतीवरून ढकलून प्रेयसीचा खून केल्याचे उघडकीस आले. तसेच संशयिताने आत्महत्येचा बनाव केला आहे. याप्रकरणी ध्रुव छिक्कार (रा. हरियाणा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तरूणीच्या मृत्युनंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ :

कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरूणीच्या मृत्युमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कराडमध्ये दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळली होती. रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात अधिकारी तळ ठोकून होते. मात्र, अधिकृत माहिती दिली जात नव्हती. रात्री उशिरा मृत तरूणीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रियकर आणि प्रेयसीमध्ये झटापट :

मूळची बिहारची असणारी २१ वर्षीय आरूषी मिश्रा आणि ध्रुव छिक्कार हे दिल्लीत एकत्र शिकत होते. त्यानंतर दोघांनीही कराडच्या कृष्णा मेडिकलमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. ध्रुव हा मलकापूरमधील सनसिटीमध्ये राहात होता.  मंगळवारी (३० जुलै) रात्री ध्रुवने आरूषीला फ्लॅटवर बोलावून घेतले. दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण असल्याचे म्हटल्यावरून दोघांमध्ये वादावादी आणि झटापट झाली. रागाच्या भरात ध्रुवने आरूषीला ढकलून दिल्याने इमारतीवरून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, प्रियकरानेही आत्महत्येचा बनाव केला. त्यात तो जखमी झाला.

मीडिया ट्रायल होऊ न देण्याची खबरदारी :

या  प्रकरणात मीडिया ट्रायल होऊ नये, याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुरेपूर खबरदारी घेतल्याचे दिसून आले. घटना घडल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे हे प्रकरण हायप्रोफाइल असल्याची शंका आली. अखेरीस गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy