Explore

Search

April 8, 2025 1:52 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : मलायका अरोरा, शूरा खान आणि अरबाज खान यांना एअरपोर्टवर एकत्र पाहून विविध चर्चांना उधाण

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. मलायका अरोरा ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते. मात्र, यावर दोघांनीही भाष्य केले नाहीये. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका ही अर्जुन कपूर याला डेट करतंय. काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत अत्यंत जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही सतत विदेशात जाताना दिसत आहे. नुकताच आता मलायका अरोरा ही मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झालीये. मात्र, यावेळी असे काही घडले की, ज्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. अगोदर अरबाज खान हा आपली पत्नी शूरा खान हिच्यासोबत एअरपोर्टवर दाखल झाला. यावेळी दोघेही जबरदस्त लूकमध्ये दिसत होते.

पत्नी शूरा खान हिचा हात पकडून फोटोसाठी पोज देताना अरबाज खान हा दिसला. अरबाज खान आणि शूरा खान हे एअरपोर्टमध्ये जाताच त्यांच्या मागून मलायका अरोरा ही देखील एअरपोर्टवर पोहोचली. मात्र, यावेळी फोटोसाठी पोज देताना मलायका अरोरा ही दिसली नाही. मलायका अरोरा घाई घाईमध्ये निघून जाताना दिसली.

मलायका अरोरा, शूरा खान आणि अरबाज खान यांना एअरपोर्टवर एकत्र पाहून आता विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही देखील जबरदस्त लूकमध्ये दिसली. मात्र, हे तिघे नेमके कुठे गेले याबद्दल काही खुलासा हा होऊ शकला नाहीये. आता याचेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहून अंदाजा लावला जातोय की, मलायकासोबत अर्जुनचे ब्रेकअप झाले. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा ही विदेशात मस्त धमाल करताना दिसली. मलायका विदेशात कोणासोबत चांगला वेळ घालवत होती हे कळू शकले नाही.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy