Explore

Search

April 13, 2025 10:32 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : आक्षेप घेणार्‍याने पुरावे न दिल्यास गुन्हा दाखल करणार

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी : आक्षेपामुळे मतदार यादीतून नाव कमी होत नाही

सातारा : कोरेगाव (Koregaon) विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीवर येणार्‍या आक्षेपांची (Objection) संख्या मोठी आहे. आक्षेप घेणार्‍याने सुनावणीवेळी आवश्यक पुरावे (Proof) सादर न केल्यास त्याच्यावर गुन्हा (Crime) दाखल केला जाणार आहे. आक्षेप घेतला म्हणून कुणाचेही मतदार यादीतून नाव कमी केले जाणार नाही. निवडणूक काळात कुठलाही चुकीचा प्रकार खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (Collector) जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पूर्वतयारी सुरू आहे. प्रारूप मतदार यादी 6 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. 20 ऑगस्टपर्यंत सुचना व हरकती घेता येतील. त्यावर निर्णय 29 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्यात येणार असून 30 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीचा कार्यक्रम सुरू असताना काही गंभीर बाबी निदर्शनास येऊ लागल्या आहेत. काही लोकांकडून मतदार यादीत बोगस नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मतदार कमी करण्यासाठी काही ठिकाणी मतदारांवर आक्षेप घेतले जात आहेत. काही जणांनी पुरावे नसतानाही हजारोंच्या संख्खेने फॉर्म 7 भरला आहे. काही बीएलओंकडून पात्र मतदारांची नावे गतीने मतदार यादीत समाविष्ट करून घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. हे सिध्द झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहे. एकाच व्यक्तीने अनेक मतदारावर पुराव्याशिवाय जादा आक्षेप घेतल्यास संबंधितावर कारवाई होते. बीएलओंनी नेमून दिलेले काम करणे आवश्यक आहे. मतदानासाठी पात्र असलेल्या व्यक्तीला मतदान ओळखपत्र मिळाले पाहिजे. कोणत्याही एकेठिकाणी मतदार मतदान करू शकतो. यासंदर्भात सर्व प्रांताधिकार्‍यांना चौकशीचे लेखी आदेश दिले आहेत. मतदारांची नावे जाणीपूर्वक कमी करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास संबंधिताला एक वर्षांची कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी चांगले सहकार्य केले असून तशीच अपेक्षा विधानसभा निवडणुकीतही आहे. कुणी चुकीचे काही केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. मतदार यादीसंदर्भात हाऊस टू हाऊस सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी 1 लाख 50 हजार मतदार चौकशी करून वगळले होते. त्यामुळे अशा मतदारांची संख्या खूप असेल असे वाटत नाही. नवीन पात्र मतदारांची नोंदणी करावी. राजकीय पक्षांनी त्यासाठी बीएलओंना मदत करावी. विधानसभेसाठी बिनचूक मतदार यादी तयार करण्याचा प्रयत्न आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मतदार यादीवर हजारों हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. मतदारांमध्ये संभ्रम आहे, याबाबत विचारले असता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, कुणी आक्षेप घेतला म्हणून कुठल्याही मतदाराचे नाव कमी होत नाही. कुणी किती आक्षेप घ्यावेत याला मर्यादा नाही. यासंदर्भात भारत निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. सुनावणी घेतल्याशिवाय कुठल्याही मतदार डिलिट केला जाणार नाही. बरेच मतदार तात्पुरते बाहेरगावी असतात. त्यामुळे आक्षेप घेणार्‍या सोबत काही तथ्य जोडले आहे का हे प्रांताधिकार्‍यांनी तपासायचे आहे. तथ्य जोडले नसेल तर आक्षेप फेटाळले जाणार आहेत. ज्याने आक्षेप घेतला तो सुनावणीवेळी आलाच नाही. मतदान कुठे ठेवायचे हा मतदाराचा अधिकार आहे. सुनावणीशिवाय कुणाचेही मतदार यादीतून नाव कमी केले जाणार नाही. 10 हजार आक्षेप आले असून सर्वांची सुनावणी घेतली जाईल असे सांगितले.
हजारो मतदारांवर आक्षेप घेणारा सुनावणी दरम्यान गैरहजर रहात असेल तर अशा व्यक्तीवर कारवाई काय करणार, असे विचारले असता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, एकाच व्यक्तीने जाणूनबुजून जादा संख्येने विना पुरावा मतदार संख्या कमी करण्यासाठी आक्षेप घेतले असल्यास रिप्रेझेंटेशन अ‍ॅक्टखाली त्याच्यावर कारवाई करणार असून प्रकरण गंभीर असल्यास गुन्हा दाखल करणार, असा इशारा त्यांनी दिला. बोगस मतदार नोंदणी करण्याचाही प्रयत्न काही ठिकाणी दिसत आहे. आमची यंत्रणा फूलफ्रूफ आहे. कोणतीही चुकीची गोष्ट लपून रहात नाही. पुरावे मिळाल्यास सोडणार नाही. आम्ही जाती-धर्म पाहून कामे करत नाही. जाणूनबाजून कुणी काही करत असेल तर खपवून घेणार नाही, असेही जितेंद्र डूडी यांनी ठणकावून सांगितले.
बोगस मतदार नोंदणी कुठल्या मतदारसंघात आहे, असे विचारले असता जिल्हाधिकरी जितेंद्र डूडी म्हणाले, कोरेगावमध्ये हा प्रकार दिसून येत आहे. तक्रार आल्यावर बीएलओकडे पुरावे दिले पण भरले नाहीत. एकाच ठिकाणी एकाच वेळी दोन ते अडीच हजार तक्रारी आल्याचे कोरेगाव तहसीलदार व प्रांताधिकार्‍यांनी सांगितले. हे मतदारांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर सुपरवायझर नेमले आहेत. कुणीही दबावाखाली काम करत असेल तर त्या अधिकार्‍यावर, कर्मचार्‍यावर कारवाई करणार आहे. काही जणांवर कारवाई होईल तेव्हा बाकीचे सुधारतील, असा इशारा त्यांनी दिला.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy