सातारा : सातारा जिल्ह्यातील क्र.4 हा अत्यंत वर्दळीचा असून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रवासी व माल वाहतूक होत असते. सदर महामार्गावर मागील दोन महिन्यांमध्ये देखभाल, दुरुस्तीची कामे केली नाहीत. सदर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, पुलांची, सर्विस रोडची अपूर्ण कामे, मुलभूत सार्वजनिक सुविधांचा अभाव यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यामध्ये जिवीत हानी होत आहे, काही लोकांना गंभीर स्वरुपाची इजा होत आहे, सबब सदरबाबतीत नागरीकांडून तक्रारी प्राप्त होत आहेत.
यापूर्वी कंत्राटदारांकडून अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करुन घेणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते विकास मंत्रालय भारत सरकार यांचे कार्यालयामार्फत राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीकरीता सुस्थितीत ठेवणेबाबत वेळोवेळी निर्देशही देण्यात आले असूनही सदर बाब संबंधित कार्यालय व संबंधित कंत्राटदार गांभीर्यपूर्वक घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने पालकमंत्री शंभूराजे देसाई या सर्व प्रश्नांबाबत सोमवारी दि. ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत.
महामार्गावरील शिंदेवाडी नवीन पूल सर्व्हिस रस्ता दोन्ही बाजूकडे, शिरवळ ट्यूब कंपनीसमोर सर्व्हिस रस्ता अपूर्ण आहे व खड्डे आहेत. शिरवळ येथील पुणे बाजूकडे सर्व्हिस रस्ता कमी रुंदीचा असून साडे सात मीटर नाही व जास्त खड्डे पडून रस्ता खराब झालेला आहे. धनगरवाडी व केसुर्डी हद्दीत एमआयडीसी कडे सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे व पुणे सातारा बाजूकडे सर्व्हिस रस्ता खड्डेमय व मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
पारगाव हद्दीत दोन्ही बाजूकडे सर्व्हिस रोडमध्ये खड्डे पडले आहे, शिंदेवाडी ते खंबाटकी घाट कोठेही दिशादर्शक फलक नाही. खंबाटकी घाटात सातारा ते पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. पुणे ते सातारा रोड अनेक ठिकाणी संरक्षक कठडे तुटले आहे.
रस्ते विकास मंत्रालय भारत सरकार यांचे कार्यालयामार्फत राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीकरीता ठेवणेबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले असूनही सदर बाब संबंधित कार्यालय गांभीर्यपूर्वक घेत नसल्याचे निदर्शनास आल्यानेच पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणांसोबत बैठक आयोजित केली आहे.
