नवी दिल्ली : भारतासह जगभरतील शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे ही घसरण झाली आहे. चीन, अमेरिका अशा प्रमुख देशांचे निर्देशांकही घसरले आहेत. भारतीय शेअर बाजारावरही त्याचा परिणआम झाला आहे. दरम्यान, या अचानक घसरणीचे नेमके कारण काय? ही पडझड आगामी काळातही अशीच चालू राहणार का? गुंतवणूकदारांनी नेमकी काय भूमिका घ्यावी? असे विचारले जात आहे. याविषय शेअर बाजारातील तज्ज्ञ अजित फडणीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
जगभरातील शेअर बाजार पडले
जपानमध्येही शेअर बाजारात घसरण झाली आहे. जपानमध्ये गेल्या 35 वर्षांतील ही सर्वाधिक मोठी पडझड आहे. जपानमधील शेअर बाजार घसरणीचे हे प्रमाण आठ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीमुळे ही स्थिती उभी ठाकली आहे. भारतीय शेअर बाजारीतील सेन्सेक्स साधारण 1400 तर निफ्टी 300 अंकांनी पडल्याचं पाहायला मिळालं.
अजित फडणीस यांनी काय सांगितले
शेअर बजारातील ही पडझड युद्धामुळे झाली असे म्हणता येणार नाही. कारण युद्धामुळे शेअर बाजार गडगडला म्हणायचं झालं तर तेलाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला असता. तेलाचे भावदेखील गडगडले आहेत. तेलाचे भाव गडगडणे हे मंदीच्या भीतीचे द्योतक आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात दोन अमेरिकेत पडझड झाली. त्याचे आता एशियन मार्केटमध्ये पडत आहेत. भारतातही शुक्रवार आणि पडझड पाहायला मिळाली.
धीर धरा, भयभीत होण्याचं कारण नाही
भारतीय शेअर बाजारातील पडझड इतर देशांच्या तुलनेत कमी झाली आहे. एका उच्चाकांवरून काहीशी करेक्शन्स येणं हे बाजाराच्या पुढच्या वाटचालीसाठी चांगली बाब असते. बाजाराला निमित्त हवे असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भयभीत होण्याचं कारण नाही. त्यांनी बाजारात आपली गुंतवणूक व्यवस्थित राखावी. दबावात येऊन भीतीने शेअर्सची विक्री करू नये. पाऊस पडल्यानंतर जसा लख्ख प्रकाश पडतो, तसा हा प्रकार आहे. त्यामुळे धीर धरावा. बाजारात खदेदीला पुन्हा एकदा संधी लाभली तर त्याचा लाभ घ्यावा असे मला वाटते.
