Explore

Search

April 13, 2025 7:44 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Paris Olympics 2024 : जर्मनी विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अमित रोहिदास हॉकी सामन्यात खेळू नाही

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी टीम शानदार प्रदर्शन करत आहे. हॉकीमधला भारताचा सुवर्णकाळ लवकरच परत येईल हा विश्वास देशवासियांमध्ये निर्माण झाला आहे. टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवलं होतं. आता भारतीय हॉकी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. महत्त्वाच म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी टीमने चांगल्या बलाढ्य संघांना नमवलय. मंगळवारी सेमीफायनलमध्ये भारताचा सामना जर्मनी विरुद्ध होणार आहे. त्याआधी हरमनप्रीत सिंहच्या भारतीय हॉकी टीमला मोठा झटका बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये अमित रोहिदासच्या स्टिकचा चुकून ब्रिटनच्या खेळाडूच्या शरीराला स्पर्श झाला. त्यासाठी अमितला रेड कार्ड दाखवण्यात आलं. भारत त्यानंतर 10 खेळाडूंनिशी मैदानात खेळत होता. अमित रोहिदासला एक सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली असून तो सेमीफायनल खेळू शकणार नाही.

रेड कार्ड म्हणजे एका सामन्याच्या बंदीची शिक्षा. त्या खेळाडूला टुर्नामेंटमधील पुढचा सामना खेळता येत नाही. “4 ऑगस्टला भारत विरुद्ध ब्रिटन सामन्याच्यावेळी FIH आचारसंहितेच उल्लंघन झालय. त्यासाठी अमित रोहिदासला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात येतय. निलंबन मॅच नंबर 35 साठी आहे. म्हणजेच जर्मनी विरुद्ध सेमीफायनल सामना. अमित रोहिदास या सामन्यात खेळू शकणार नाही. भारत केवळ 15 प्लेयर्ससह खेळेल” असं FIH च्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

सुरुवातीला ही घटना गंभीर मानली नाही

क्वार्टर फायनल मॅचमध्ये 31 वर्षीय अमित रोहिदासची ब्रिटनचा फॉरवर्ड विल कॅलनन बरोबर भिडाभीड झाली. यावेळी रोहिदासची हॉकी स्टिक कॅलननच्या चेहऱ्याजवळून गेली. मैदानावरील मॅच रेफ्ररीने सुरुवातीला ही घटना गंभीर मानली नाही. वीडियो रेफरल पाहिल्यानंतर निर्णय बदलला. रोहिदासला रेडकार्ड दाखवलं.

जबरदस्त झुंज

भारत आणि ब्रिटनमध्ये काल रंगतदार सामना झाला. 60 मिनिटांचा खेळ भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवणारा होता. पहिला सत्रात दोन्ही संघांनी जबरदस्त झुंज दिली. त्यामुळे या सत्रात 0-0 अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात दोन्ही टीम्सनी 1-1 गोल केलं. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यावेळी भारताने 4-2 अशी आघाडी घेत विजय निश्चित केला.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy