सातारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अमोल शिंदे यांनी केले आहे.
चर्मकार समाजाचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत 2024-2025 या वर्षासाठी अनुदान व बिज भांडवल योजना, केंद्र शासनामार्फत एन.एस.एफ.डी.सी. योजना यासह अनेक योजना राबविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डानपुलाजवळ, सातारा येथे संपर्क साधावा.
