सातारा : दिव्यांगांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विाागामार्फत बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तीकडे किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ 18 ते 50 वयोगटामधील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेमधील जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
