Explore

Search

April 14, 2025 1:11 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : संभाजी ब्रिगेडचे 22 ऑगस्ट रोजी वाशी येथे राज्य संमेलन

प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची पत्रकार परिषदेत माहिती
सातारा :  संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय संमेलन ठाणे जिल्ह्यातील वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यरंग मंदिरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम होत असून कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे अभिनेते सयाजी शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, राज्य संघटक प्रदीप कणसे, जिल्हाध्यक्ष शिवम कदम, कार्याध्यक्ष सुमित भोसले, शहराध्यक्ष अनिकेत मोरे, व जिल्हा संघटक अभिजीत निकम इत्यादी यावेळी उपस्थित होते.
प्रवीण गायकवाड पुढे म्हणाले संभाजी ब्रिगेडने गेल्या दहा वर्षांमध्ये अर्थकारण चळवळीला प्राधान्य दिले आहे. आर्थिक साक्षरता घडवणे तरुणांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे ही यामागची हेतू आहेत. दिनांक 22 ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे पंधराशे प्रतिनिधींचे राज्य संमेलन वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत प्रसिद्ध लेखक प्रफुल वानखेडे यांची मुलाखत अभिजीत कारंडे घेणार आहेत. ज्येष्ठ व्याख्याते निरंजन टकले गांधींच्या स्वप्नातला भारत या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार हे महाराष्ट्र धर्म या विषयावर बोलणार आहेत. तसेच ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार ज्ञानेश महाराव यांचे सुद्धा विचार या निमित्ताने ऐकावयास मिळणार आहेत.
कृषी उत्पन्नावर आधारित उद्योग उभा करून अर्थकारणाला नवा चेहरा देणाऱ्या काही उद्योगपतींचा सत्कार यावेळी होणार आहे. यामध्ये कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, बारामतीचे विलास शिंदे व ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र पवार यांचा सत्कार केला जाणार आहे.  समारोपाच्या सत्रामध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार तसेच माजी खासदार विजय दादा मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे.
या संमेलनामध्ये 35 जिल्ह्यातील प्रतिनिधींशी संवाद साधने आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम करणे नव्या ध्येयधोरणांची जुळणी करणे तसेच संघटना बळकटीकरण आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी अशी विविध सत्र या संमेलनात असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.
Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy