Explore

Search

April 13, 2025 10:33 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara Crime : मुलानेच मारला बापाच्या दागिने, पैशावर डल्ला; घरफोडीच्या गुन्ह्याची बारा तासात उकल

सपोनि पृथ्वीराज ताटे आणि टीमची दमदार कारवाई, घरफोड्याच्या आवळल्या मुसक्या

सातारा : जावली तालुक्यातील घरफोडीत मुलानेच बापाच्या दागिने आणि पैशांवर डल्ला मारल्याचे उघड करण्यात मेढा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी संबंधित मुलाच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून चोरीस गेलेला 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जावली तालुक्यातील कुडाळ येथील सेवानिवृत्त कर्मचारी कृष्णा सखाराम शेवते यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने  सोन्याचे दागिने व रोख पैशासह तीन लाख तीस हजारांचा डल्ला मारला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि पृथ्वीराज ताटे आणि त्यांच्या टीमने कसून तपास करत या घरफोडीचा छडा फक्त बारा तासात लावला असून शेवते यांच्या मुलगा निलेश यानेच ही घरफोडी केल्याची उकल करून दिवट्या मुलाला अटक केली आहे त्याला न्यायालयाने 9 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सपोनि ताटे यांनी मेढा पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झाल्यानंतर आपल्या कारभाराची चुणूक दाखवून दिली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ येथील कृष्णा शेवते यांच्या राहते बंद घराचे दरवाज्याचे कुलूप काढून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घराचे भिंतीतील लाकडी कपाताचा कडी कोयंडा काढून कपाटातील पाच तोळे वजनाची  सोन्याची बोरमाळ व रोख रक्कम असे एकूण 80,000 रू रोख रक्कम असा 3,30,000 रू. किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरुन नेला होता.याबाबतची तक्रार शेवते यांनी पोलिसात दाखल केली होती.गुन्ह्याच्या अनुशंगाने सखोल तपास करत असताना ही घरफोडी शेवते यांचा घरातून विभक्त राहणारा मुलगा निलेश कृष्णात शेवते याने केला असल्याबाबत संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आलेला आहे.

आरोपी निलेश याच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस गेलेली पाच तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ तसेच रोख रक्कम 55,500 रू.असा एकुन 3 लाख 30 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने 9 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सपोनि पृथ्वीराज साठे यांनी मेढा पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यानंतर घरपोडी सारख्या होण्याची बारा तासात उकल केल्याबद्दल सपोनि ताटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली केली या कारवाईत सपोनि पृथ्वीराज ताटे, सहा.पोलीस फौजदार विकास गंगावणे, विजय शिंगटे, पो. हवा. डी. जी. शिंदे, पी. डी. माने, पो. कॅा.आर. टी.शेख, सनी काळे, अभिजित वाघमळे यांनी सहभाग घेतला.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy