Explore

Search

April 13, 2025 10:29 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : आरोग्य विभागाची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण

जि प सीईओ याशनी नागराजनं यांची माहिती

सातारा : महाराष्ट्र शासना मार्फत विविध कार्यालयाकडील भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्या अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदाची भरती प्रक्रिया पुर्ण करणेत आली आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागा कडील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांची ही परिक्षा घेणेत आली होती. त्या मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची यादी शासना कडून विभागास प्राप्त झाली होती. प्राप्त झालेल्या यादी नुसार पात्र उमेदवार यांची कागदापत्र पडताळणी आरोग्य विभागा, जिल्हा परिषद सातारा मार्फत करणेत आली.

आरोग्य विभागा मार्फत करणेत आलेल्या कागदपत्र तपासणी डॉ महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि प सातारा यांच्या मार्गदर्शना खाली श्री श्रीनिवास पाटील, कक्ष अधिकारी तथा प्रशासन अधिकारी, सौ संजला शिंदे, अधिक्षक, श्री देशमुख, अधिक्षक यांनी प्रशान व तांत्रिक कर्मचारी यांचे सहभागने दि 05, 06 व 07 ऑगस्ट 2024 रोजी छ.शिवाजी महाराज सभागृह जि प सातारा येथे करणेत आली.

महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य सेवक 40 टक्के या संवर्गात एकूण 75 जागा करीता परिक्षा घेणेत आली त्या करीता एकूण 185 परिक्षार्थीनां कागदपत्र तपासणी करीता बोलवण्यात आले. या पैकी 157 उमेदवार हजर होते व 28 उमेदवार गैरहजर होते. त्याच प्रमाणे आरोग्य सेवक महिला या संवर्गात एकूण 353 जागा करीता परिक्षा घेणेत आली त्या मध्ये 337 उमेदवार पात्र झाले त्यांना कागदपत्र पडताळणी करीता बोलवण्यात आले. या पैकी 330 उमेदवार कागदपत्र पडताळणी करीता हजर होते व 7 उमेदवार गैरहजर होते. औषध निर्माण अधिकारी यांची एकूण 35 जागा करीता परिक्षा घेणेत आली, त्या मधील एकूण 92 पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करीता बोलवण्यात आले. या मध्ये 17 उमेदवार गैरहजर होते.

कागदपत्र पडताळणी मध्ये प्रथम हजर असलेल्या उमेदवारांची बायोमेट्रीक हजेरी नोंदवून त्यांची अर्ज सादर करताना सादर केलेले कागदपत्राची पडताळणी करणेत आली. आरोग्य विभाग, जि प सातारा अंतर्गत असे एकूण 562 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पुर्ण करणेत आली.

भरती प्रक्रिया ही पारदर्शक असून, या मध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेणेत आली आहे. शासनाने घेतलेल्या या परिक्षेचे निकाल संबंधीत सर्व उमेदवारांना कळवण्यात आले आहेत. सदरच्या भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाने केलेली असून निकाल ही शासनानेच प्रदर्शित केले आहेत. जि प मार्फत कागदपत्र पडताळी केली असून लवकरच अंतिम नियुक्ती देणेत येणासर आहे. डॉ महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सातारा.

शासनाने केलेल्या भरती प्रक्रिये मधुन सातारा जिल्हयास रिक्त पदा नुसार उमेदवार उपलब्ध झाले आहेत. सदरची नियुक्ती प्रक्रिया ही अत्यंत आरदर्शी रितीने राबवून जिल्हयातील रिक्त पदांची भरती होणार असल्याने आरोग्य विभागस पुरेसे कार्यक्रम मनुष्य बळ लवकरच उपलब्ध होऊन जनतेस चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध होणेस मदत हाईल. –श्रीम याशिनी नागराजन, भा.प्र.से मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy