Explore

Search

April 13, 2025 10:31 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Pune Food Factory : पुण्यातील कारखान्यातून अमोनिया गॅस लीक

17 कर्मचारी रुग्णालयात

पुणे  : पुणे शहराजवळ असलेल्या यवत येथील एका कंपनीत धोकादायक प्रकार घडला. फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती सुरु झाली. यामुळे कारखान्यातील काम करणाऱ्या 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 17 जणांमध्ये अनेक महिला असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला आयसीयूमध्ये ठेवले आहे. यवतजवळील भाडगाव येथे बुधवारी सकाळी रेडी-टू-ईट फूड प्रोसेसिंग यूनिटमध्ये ही घटना घडली.

पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांनी सांगितले की, रेडी-टू-ईट खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपनीत अमोनिया गॅसचा वापर केला जातो. त्यासाठी त्या ठिकाणी 18 डिग्री सेल्सियस तापमान ठेवले जाते. त्या कारखान्यात घटना घडली तेव्हा 25 जण काम करत होते. त्यातील 17 जण अमोनिया गॅसची गळती होणाऱ्या भागाच्या जवळ होते. यामुळे सर्वांना त्रास होऊ लालगा. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बैचनी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्वरीत कंपनीत तपासणी करण्यात आली. त्यावेळी अमोनिया वायूची गळती सुरु असल्याचे लक्षात आले. त्या झाल्यानंतर मुख्य रेग्यूलेटर त्वरीत बंद करण्यात आले. त्यामुळे मोठा अपघात टळला. अन्यथा दुर्घटना घडली असती. त्यामुळे मोठा धोका टळला. अमोनियाचा त्रास झालेल्या 17 पैकी 16 कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु आयसीयूमध्ये दाखल असलेल्या महिलेवर उपचार सुरु आहे. तिची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy