सातारा : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 मध्ये सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रथम पारितोषिक 5 लाख, द्वितीय पारितोषिक 2.5 लाख, तृतीय पारितोषिक 1 लाख रुपये असे राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. तसेच जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार व प्रमाणपत्र असे स्वरुप असणार आहे. अधिक माहितीसाठी 81 69 88 28 98 या क्रमांकावर संपर्क साधावा.
