आवाहनाला प्रतिसाद देत झाले विक्रमी 629 रक्तबाटल्यांचे संकलन
सातारा : महाराष्ट्र शासनाने, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या’’ तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करून अग्रेसर ठरलेल्या श्री जानाई मळाई सोशल ऍण्ड एज्युकेशनल फौंडेशन (जेमसेफ), साताराच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही, ‘संस्थेचे मार्गदर्शक आधारस्तंभ, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेशदादा शिंदे (MLA Mahesh Shinde)’ यांच्या वाढदिवसाचे (Birthday) औचित्य साधून, ‘संस्थेच्या समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, माने कॉलनी, सातारा’ या शैक्षणिक संकुलात अतिभव्य रक्तदान शिबीराचे (Blood donation camp) दोन स्वतंत्र कक्षात आयोजन करण्यात आले होते. या महारक्तदान शिबीराचे उद्घाटन ना. महेशदादा शिंदे यांच्या भगिनी डॉ. सौ. अरूणाताई बर्गे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब कॅम्प साताराचे अध्यक्ष संदिप जाधव यांच्यासह आ. महेशदादा शिंदे यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, अतुल माने, संस्थेचे सचिव संजीव माने, संचालक दत्तात्रय जाधव, भगवान माने, बळवंत फडतरे, विजय घाडगे, उपाध्यक्ष निर्मलसिंग बन्सल, मनिषा कदम, वासंती माने, ऍड. मनजीत माने, चंद्रहार माने, जांभे गावचे सरपंच आनंदा सप्रे, रघ्ाूनाथ चव्हाण, शरद गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करून मोठया प्रमाणात रक्त बाटल्यांचे संकलन केले जाते. या वर्षी रक्तदान शिबीरातून कमीत कमी विक्रमी 500 रक्त बाटल्या रक्त संकलीत करण्याचा संकल्प संस्थेने केला होता. या संकल्पपुर्तीसाठी संस्थेने विविध समाजघटकांना आवाहन केले होते. या आवाहनाला रक्तदात्यांनी अपूर्व आणि अद्भ्ाूत प्रतिसाद देऊन, केलेल्या संकल्पापेक्षा जास्त विक्रमी 629 रक्त बाटल्यांचे संकलन या महारक्तदान शिबीरामधून करण्यात आले. या 629 रक्तदात्यांपैकी 113 एवढया उच्चांकी संख्येने महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून, ‘रक्तदानाच्या क्षेत्रात महिलासुध्दा कुठेच कमी नाहीत, हे दाखवून दिले.’
यावेळी शिबीराच्या उद्घाटक ना. महेशदादा शिंदे यांच्या भगिनी डॉ. अरूणाताई बर्गे यांनी स्वत: रक्तदान करून सर्वांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. एवढया मोठया प्रमाणावर रक्त संकलीत होणारे हे जिल्ह्यातील पहिलेच रक्तदान शिबीर असल्याचे अनेक जाणकार व्यक्तींनी बोलून दाखविले. याप्रसंगी रक्तदात्यांना संस्था संचालक, शाळा व्यवस्थापन कमिटी, माता-पालक संघ, परिवहन समितीचे पदाधिकारी यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
समाजाप्रती असलेल्या सामाजिक बांधीलकीची जाण व भान असलेल्या श्री जानाई शिक्षण संस्थेमार्फत नेहमीच विविध समाजोपयोगी व इतरांना आदर्श व प्रेरणा देणारे प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबविले जातात. सध्या विविध गंभीर व साथीचे आजार उद्भवत असल्याने रूग्णांना रक्ताची असणारी आवश्यकता व सातार्यातील रक्तपेढयांमध्ये असणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून, संस्थेमार्फत महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहेे. संस्थेचे कार्य इतर संस्थांना दिशादर्शक मार्गदर्शक आणि समाजाभ्ािुख असल्याचे गौरवोद्गार डॉ. अरूणाताई बर्गे यांनी या प्रसंगी काढले. तसेच यावेळी संस्थेच्या शैक्षणिक सामाजिक कार्याने प्रभावित होऊन, संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन, संस्थेच्या दुर्गंम भागातील श्रीराम माध्यमिक विद्यालय, चिखली. ता. जि. सातारा. या शाळेच्या संपूर्ण इमारतीचे नुतनीकरण, ‘रोटरी क्लब कॅम्प सातारा’ यांच्या मार्फत करून देत असल्याचे या क्लबचे अध्यक्ष संदिप जाधव यांनी या प्रसंगी जाहीर केले व जागेवरच या शाळेच्या नुतनीकरणास आवश्यक असणार्या सर्व साहित्यांची पोहोच या शाळेत केली.
या रक्तदान शिबीरामध्ये संस्थेच्या कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, समाजभ्ाूषण- दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री. छ. प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी, सातारा. तसेच संस्थेच्या मौजे कुसवडे, चिखली ता. जि. सातारा. जायगांव ता. कोरेगांव शाखांमधील पालक, या गावांचे ग्रामस्थ, संस्थेचे पदाधिकारी, मौजे कोडोली, संभाजीगनर, समर्थनगर, अहिल्यानगर, खिंडवाडी, देगांव, कारंडवाडी, जैतापूर, सातारा शहर व एम. आय. डी. सी. परिसरातील रक्तदात्यांनी संस्थेने केलेल्या आवाहनास उदंड व उत्फुर्त प्रतिसाद देवून, सहभागी होवून महारक्तदान शिबीर विक्रमी व यशस्वी करण्यामध्ये योगदान दिले.
अक्षय ब्लड बँक व बालाजी ब्लड बँक सातारा यांनी या महारक्तदान शिबीरासाठी सहकार्य केले.
महारक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक सलीम मुलाणी, संस्थेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख कु. प्रतिभा जाधव, प्राथमिक विभागाचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अमोल काटे, माध्यमिक शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष शामराव पवार, सदस्य सुखदेव शिंदे, अमोल साळूंखे, सुनिता शिंदे, संतोष रासकर, आनंदा दानवले, अंकुश साळूंखे, निलम खामकर, अंकिता चव्हाण, काजल जगताप, सुवर्णा राऊळ, सीमा वाघमारे, नम्रता कुडाळकर, रूपा माने, दादा जाधव, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, निलम भोसले, सुरज शेडगे, प्रदिप चपटे, संजय शिंदे, पार्वती चव्हाण, दिपमाला लोहार, अक्षय माने, दिपा फडतरे, संभाजी टकले, आरीफ खान, अफरोज शेख तसेच शाळा व्यवस्थापन कमिटी, माता-पालक संघ, परिवहन समितीचे सभासद, पदाधिकारी संस्थेच्या सर्व शाखांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पालक यांनी परिश्रम घेतले.
संस्थेच्या या समाजाभिमुख अपूर्व भरीव योगदानाबदद्ल, संस्थेच्या उपक्रमाबदद्ल सातारा शहरासह जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे.
