Explore

Search

April 13, 2025 8:19 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : रक्षाबंधन सणानिमित्त सातारा कारागृहात महिला बंदयांनी तयार केल्या राख्या

महिलांनी राख्या  खरेदी करण्याचे कारागृह प्रशासनाचे आवाहन

सातारा : कारागृहातील महिला बंद्यांच्या हाताला काम मिळावे या उदात्त धोरणाने आणि विचारणे पुणे विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक, स्वाती साठे यांनी संकल्पनेतून आणि माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांच्या सहकार्याने सातारा कारागृहातील महिला बंद्यांना सुबक व आकर्षक राखी तयार केल्या आहेत. आहे. ह्या राख्या महिलांनी खरेदी करावे, असे आवाहन  कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी केले.

यामध्ये माणदेशी फाउंडेशन, शाखा सातारा येथील प्रोग्रॅम डायरेक्टर अपर्णा सावंत यांच्या योजने अंतर्गत महिला बंद्यांना रक्षाबंधनचे औचित्य साधून राखी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण ट्रेनर जया काळे, धनश्री पवार यांनी दिले. सदर प्रशिक्षणामध्ये कारागृहातील सर्व महिला बंद्यांनी 200 हून अधिक आकर्षक व सुबक राख्या तयार केल्या.

सदर राखी तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमा वेळेस अपर्णा सावंत, ट्रेनर जया काळे, धनश्री पवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, महिला शिपाई गीता दाभाडे, जयश्री पवार, मीनाक्षी जाधव, माधुरी वायकर, ज्योती शिंगरे, रूपाली नलावडे, अंकिता करपे, प्रतीक्षा मोरे इत्यादी हजर होते.  प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी यांनी केले होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy