Explore

Search

April 13, 2025 8:12 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Skin Care : पावसाळ्यात घ्या त्वचेची काळजी

या टिप्स वापरून चेहऱ्यावर येईल खास ग्लो!

उकाड्यापासून सुटका करणारा, चोहीकडे वातावरण हिरवगार करणारा पावसाळा सुखावणारा असतो. अनेकांना पावसाळा इतर ऋतुंच्या तुलनेत खूप आवडतो. पावसाळा सुखावणारा असला तरी अनेक प्रकारचे आजार व त्वचेच्या समस्या घेऊन येतो. पावसाळ्यात त्वचा चिकट होणं, पिंपल्स येण, त्वचेवर रॅशेस येणं अशा समस्या जाणवतात. चेहऱ्याची चमक पावसाळ्यात फिकी पडते, त्यामुळे या ऋतुत त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी एक्सपर्ट्सनी काही टिप्स दिल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक टिकवून ठेवू शकता.

क्लिन्झिंग करा : पावसाळ्यात आर्द्रतेमुळे चेहरा चिकट होतो. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण काढण्यासाठी दोनदा चेहरा धुण्यास विसरू नका. शक्य असल्यास चांगल्या क्लिन्झरने आपला चेहरा स्वच्छ धुवा. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्यास विसरू नका.

टोनर लावायला विसरू नका : पावसाळ्यात चेहऱ्यावर पिंपल होऊ नये यासाठी टोनर लावा. टोनर त्वचेचा पीएच बॅलेन्स ठेवतं, यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे कमी होतात.

मॉईश्चरायझर लावा : पावसाळ्यात मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. या ऋतूमध्ये असे मॉईश्चरायझर लावावे जे त्वचेला तेलकट न करता हायड्रेट ठेवेल. यासाठी तुम्ही जेल बेस्ड मॉईश्चरायझर निवडू शकता.

सनस्क्रीन लावा : उन्हाळ्यात अनेकजण न चुकता सनस्क्रीन लावतात, पण पावसाळ्यात सनस्क्रीन लावण्याची काय गरज आहे, असं काहींना वाटतं. मात्र ऋतू कोणताही असला तरी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं असतं. सनस्क्रीन प्रोटेक्टिव्ह लेयर म्हणून काम करतं, ते या ऋतूमध्ये चेहऱ्याला संसर्ग आणि यूव्ही किरणांपासून वाचवतं.

एक्सफोलिएट करा : पावसाळ्यात मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि छिद्र उघडण्यासाठी एक्सफोलिएट करणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एक्सफोलिएट (स्क्रब) करायला पाहिजे.

स्वत:ला हायड्रेटेड ठेवा : पावसाळ्यात अनेकजण पाणी कमी पितात, पण असं करू नये. या ऋतूत आपल्याला जास्त घाम येतो. त्यामुळे आपण पुरेसं पाणी प्यावं. पाणी प्यायल्याने आपली त्वचा आतून हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचेची चमक टिकून राहते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy