नागरीक व विद्यार्थ्यांचा उस्त्फुर्त प्रतिसाद
सातारा : हर घर तिरंगा अभियानांतर्गत पाटण महसूल प्रशासनामार्फत मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मेरेथॉन स्पर्धेला पाटणकरांनी उस्त्फुर्त असा प्रतिसाद दिला.
प्रारंभी नायब तहसीलदार पंडित पाटील हिरवा यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर मेरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
या मॅरेथॉन स्पर्धेत तालुका क्रीडा अधिकारी दर्शना सूर्यवंशी, विनायक पाटील, प्रफुल्ल जाधव, शकील मुल्ला,दीपक कांबळे यांच्यासह नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्यानंतर तिरंगा शपथही घेण्यात आली. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये पाटण प्रशासनामार्फत तिरंगा यात्रा, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा मानवंदना यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
