Explore

Search

April 13, 2025 10:34 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पूर्णाकृती पुतळा त्वरीत बसवावा : पालकमंत्री शंभूराज देसाई 

सातारा :  महाबळेश्वर बाजार पेठेच्या चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार  छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसविण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

महाबळेश्वर येथील आराम चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या अनुषंगाने पुतळा समितीसोबत पालकमंत्री यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

महाबळेश्वर येथे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक वर्षभर येत असतात. अशा पर्यटनस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत्यत देखणा व दिमाखदार पुतळा असणे आवश्यक आहे.  येथील आराम चौकात पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा होता. त्या ठिकाणी जागा निश्चित करुन पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी महाबळेश्वर नगर पालिकेने तात्काळ बैठक घ्यावी. दोन दिवसाच्या आत चौक सुशोभिकरण व पुतळा तयार करण्यासाठी वास्तुशिल्पकारांकडून डिझाईन तयार करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार त्वरीत पूर्णाकृती पुतळा बसवावा, असे निर्देश देवून पालकमंत्री देसाई यांनी पुढील आठ दिवसाच्या आत महाबळेश्वर नगर पालिकेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्याधिकारी यांना दिल्या.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy