ISO मानांकन मिळविणारे राज्याच्या कृषी विभागातील जिल्हास्तरावरील पहिले कार्यालय
सातारा : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा या कार्यालयास 150 9001:2015 मानांकन प्राप्त झाले. सदरचे मानांकन प्रामुख्याने अधिकारी व कर्मचारी यांना बसण्याची उत्तम व्यवस्था करणे, कार्यालयातील अभिलेखांचे वर्गीकरण फरणे, अभिलेख कक्षात अभिलेखांची शाखानिहाय सुव्यवस्थित मांडणी करणे, कार्यालयाची निर्वामत साफसफाई, कार्यालयाचे सुशोभीकरण, प्रत्येक मेजनिहाय सहा गढ्ढे पध्दत, प्रत्येक शाखेची Standard Operating Procedure (मानक कार्यप्रणाली) तयार करणे, शासनाकडील सूचनानुसार प्रसिध्द करावयाचे माहितीदर्शक फलक लावणे इ बाबींच्या पूर्ततेच्या अधीन राहून केले जाते. एकदंरीत यामुळे कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतासाठी कार्यालयास सेवा देणे अधिक सोईचे होणार आहे.
भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आयएसओ मानांकनासाठी आवश्यक बाबीची पूर्तता करणेकामी परिश्रम घेतले. तसेच या कार्यालयातील लेखाधिकारी सितल करंजेकर यांनीदेखील विशेष महत्त्वपूर्ण योगदान दिले. ISO 9001:2015 मानांकन मिळविणारे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय सातारा हे राज्यातील कृषी विभागाचे जिल्हास्तरावरील पहिले कार्यालय ठरले आहे. दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हयाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण समारंभाचे मुख्य शासकीय कार्यक्रमावेळी सदरचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांचे देखील या पध्दतीने ISO 9001.2015 मानांकन मिळविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले.
